जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : ठाकूरचा पंजाबला पंच, दिल्लीच्या विजयाने RCB ला धक्का

IPL 2022 : ठाकूरचा पंजाबला पंच, दिल्लीच्या विजयाने RCB ला धक्का

IPL 2022 : ठाकूरचा पंजाबला पंच, दिल्लीच्या विजयाने RCB ला धक्का

IPL 2022 शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) उत्कृष्ट बॉलिंगमुळे दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा (Delhi Capitals vs Punjab Kings) 17 रननी पराभव केला आहे. दिल्लीने दिलेल्या 160 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 142 रन करता आले.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी मुंबई, 16 मे : शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) उत्कृष्ट बॉलिंगमुळे दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा (Delhi Capitals vs Punjab Kings) 17 रननी पराभव केला आहे. दिल्लीने दिलेल्या 160 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 142 रन करता आले. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने 4 ओव्हरमध्ये 36 रन देऊन 4 विकेट घेतल्या. आयपीएलमधली (IPL) शार्दुलची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. शार्दुलशिवाय अक्षर पटेल-कुलदीप यादवला 2-2 आणि एनरिच नॉर्कियाला 1 विकेट मिळाली. पंजाबकडून जितेश शर्माने सर्वाधिक 44 रन केले. या सामन्यात पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 159/7 एवढा स्कोअर केला. मिचेल मार्शने 63, सरफराज खानने 32 आणि ललित यादवने 24 रनची खेळी केली. पंजाबकडून लिव्हिंगस्टोन आणि अर्शदीपला 3-3 विकेट मिळाल्या, तर रबाडाला एक विकेट घेण्यात यश आलं. या विजयामुळे दिल्लीच्या प्ले-ऑफला (IPL Play Off) पोहोचण्याच्या आशा आणखी वाढल्या आहेत, तर दुसरीकडे पंजाबसोबतच आरसीबीच्या (RCB) प्ले-ऑफच्या मार्गातही मोठा अडथळा निर्माण झाला आहे. दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिल्लीने 13 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. आरसीबीनेही दिल्ली एवढ्याच मॅच जिंकल्या आहेत, पण दिल्लीचा नेट रनरेट प्लसमध्ये आणि आरसीबीचा मायनसमध्ये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात