जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : CSK आणि MI कमजोर, या दोन टीमकडून चेन्नई-मुंबईला धोका!

IPL 2022 : CSK आणि MI कमजोर, या दोन टीमकडून चेन्नई-मुंबईला धोका!

IPL 2022 : CSK आणि MI कमजोर, या दोन टीमकडून चेन्नई-मुंबईला धोका!

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मोसमाला सुरूवात झाली आहे. यावर्षी 8 ऐवजी 10 टीम सहभागी झाल्या आहेत. पहिलाच सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होत आहे. आयपीएल इतिहासामध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सगळ्यात यशस्वी टीम आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 मार्च : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मोसमाला सुरूवात झाली आहे. यावर्षी 8 ऐवजी 10 टीम सहभागी झाल्या आहेत. पहिलाच सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होत आहे. आयपीएल इतिहासामध्ये मुंबई इंडियन्स सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या, तर त्याखालोखाल चेन्नई सुपर किंग्सला 4 वेळा आयपीएल जिंकता आली आहे. मुंबई (Mumbai Indians) आणि चेन्नईने सर्वाधिक ट्रॉफी जिंकल्या असल्या तरी भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याच्या मते यंदा दोन्ही टीम कमजोर दिसत आहेत. स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना हरभजन म्हणाला, ‘चेन्नई आणि मुंबईमध्ये पहिल्यासारखे मोठे खेळाडू नाहीत, त्यामुळे दोन्ही टीम कमकुवत दिसत आहेत. ऋषभ पंतची दिल्ली (Delhi Capitals) आणि केएल राहुलच्या (KL Rahul) लखनऊकडून या दोन्ही टीमना टक्कर मिळेल. गौतम गंभीरच्या मेंटरशीप खाली लखनऊने चांगली टीम तयार केली आहे.’ गौतम गंभीरने (Gautam Gambhir) त्याच्या नेतृत्वात केकेआरला दोन वेळा चॅम्पियन बनवलं, पण यानंतर टीमला एकदाही ट्रॉफी जिंकता आली नाही. लखनऊ आणि गुजरातची टीम पहिल्यांदाच आयपीएल खेळत आहे. गुजरातच्या टीमचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) आहे. पांड्या बराच काळ मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग होता, पण मागच्या मोसमात त्याची कामगिरी निराशाजनक झाली. तसंच टी-20 वर्ल्ड कपमध्येही हार्दिक अपयशी ठरला. आयपीएलच्या या मोसमात मुंबईची टीम नवी आहे. हार्दिक पांड्याशिवाय क्विंटन डिकॉक, कृणाल पांड्या आणि ट्रेन्ट बोल्ट हे महत्त्वाचे खेळाडू यावेळी मुंबईकडून खेळणार नाहीत. तर आयपीएलच्या मागच्या मोसमात 600 पेक्षा जास्त रन करणारा चेन्नईचा ओपनर फाफ डुप्लेसिस यावेळी आरसीबीचा (RCB) कर्णधार आहे. तसंच शार्दुल ठाकूरलाही दिल्लीने लिलावात विकत घेतलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात