जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : लिव्हिंगस्टोनने मारला आयपीएलमधला सगळ्यात मोठा सिक्स, धोनीही बघत बसला, VIDEO

IPL 2022 : लिव्हिंगस्टोनने मारला आयपीएलमधला सगळ्यात मोठा सिक्स, धोनीही बघत बसला, VIDEO

IPL 2022 : लिव्हिंगस्टोनने मारला आयपीएलमधला सगळ्यात मोठा सिक्स, धोनीही बघत बसला, VIDEO

पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या (CSK vs Punjab Kings) आयपीएल सामन्यात (IPL 2022) टॉस हरल्यानंतर खराब सुरूवात केली, पण इंग्लंडचा क्रिकेटपटू लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) धमाका करत पंजाबला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 एप्रिल : पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या (CSK vs Punjab Kings) आयपीएल सामन्यात (IPL 2022) टॉस हरल्यानंतर खराब सुरूवात केली, पण इंग्लंडचा क्रिकेटपटू लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) धमाका करत पंजाबला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणलं. मुकेश चौधरीच्या ओव्हरमध्ये लिव्हिंगस्टोनने फोर आणि सिक्सचा पाऊस पाडला, त्याने 32 बॉलमध्ये 60 रन केले, यात 5 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजाने इनिंगची पाचवी ओव्हर मुकेश चौधरीला दिली. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला लिव्हिंगस्टोनने आयपीएलच्या या मोसमातला सगळ्यात लांब सिक्स लगावला. मिडविकेट बाऊंड्रीच्या बाहेर बॉल 108 मीटर लांब गेला. मोसमातला दुसरा सगळ्यात लांब सिक्सही लिव्हिंगस्टोनच्याच नावावर आहे, त्याने 105 मीटरचा सिक्सही मारला. लियाम लिव्हिंगस्टोनने मारलेला हा उत्तुंग सिक्स विकेटच्या मागे उभा असलेला एमएस धोनीही बघत बसला. पहिली सिक्स मारल्यानंतर त्याने ओव्हरच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या बॉलला फोर मारली, तर शेवटच्या बॉलला त्याने पुन्हा एकदा सिक्स ठोकली. मुकेश चौधरीच्या या ओव्हरला 26 रन आले. जडेजाने केलं आऊट लियाम लिव्हिंगस्टोनने 10 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला ब्राव्होला सिक्स मारून अर्धशतक पूर्ण केलं. 27 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण झालं. पण 11व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला जडेजाच्या बॉलिंगवर लिव्हिंगस्टोन आऊट झाला. अंबाती रायुडूने लिव्हिंगस्टोनचा कॅच पकडला, योगायोगाने रायुडूनेच सुरूवातीला लिव्हिंगस्टोनचा कॅच सोडला होता. लिव्हिंगस्टोनच्या या आक्रमक बॅटिंगमुळे पंजाब 200 रनचा टप्पा गाठेल असं वाटत होतं, पण शेवटच्या 10 ओव्हरमध्ये चेन्नईने टिच्चून बॉलिंग केली, त्यामुळे पंजाबला 20 ओव्हरमध्ये 180/8 पर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून ड्वॅन प्रिटोरियस आणि क्रिस जॉर्डनला 2-2 विकेट घेण्यात यश आलं. तर मुकेश चौधरी, ब्राव्हो आणि जडेजा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात