मुंबई, 15 मे : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी रविवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामन्यात कार अपघातात मरण पावलेला ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याला अनोखी श्रद्धांजली वाहिली. सर्व खेळाडूंनी सायमंड्सच्या सन्मानार्थ काळ्या पट्ट्या दंडावर लावल्या होत्या. सायमंड्स याचे शनिवारी रात्री वयाच्या 46 व्या वर्षी कार अपघातात निधन झाले. अष्टपैलू खेळाडूच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. मात्र, या सामन्यात सीएसकेच्या संघाला चांगली फलंदाजी करता आली नाही. प्रथम खेळताना त्याने 5 विकेट्सवर 133 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडने अर्धशतक केले.
अँड्र्यू सायमंड्सही आयपीएलमध्ये खेळला होता. यापूर्वी तो डेक्कन चार्जर्सचा भाग होता, जी आता आयपीएलमध्ये भाग घेत नाही. त्यानंतर मुंबई इंडियन्सकडून खेळला. चार्जर्सकडून खेळताना त्याने 2008 च्या पहिल्या टप्प्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 53 चेंडूत 117 धावांची नाबाद खेळी खेळली होती. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचाही तो भाग होता. यापूर्वी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचेही नुकतेच निधन झाले होते.
Against all odds 1️⃣ 3️⃣ 4⃣ to defend! #CSKvGT #Yellove #WhistlePodu pic.twitter.com/zZQOSgRX6e
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 15, 2022
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाऊन्सविलेजवळ सायमंड्सच्या कारला अपघात झाला. त्याची कार एलिस नदीच्या पुलावरून बाहेर आली आणि खाली पडली. सायमंड्स स्वतः कार चालवत होता. स्थानिक आपत्कालीन सेवांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. आता फॉरेन्सिक क्रॅश युनिट त्याच्या अपघाताची चौकशी करत आहे.
Andrew Symonds Died: मंकीगेट ते दारूची नशा... वादग्रस्त आयुष्याचा अकाली शेवट
विशेष म्हणजे सायमंड्सची कारकीर्द चमकदार होती. त्याने 198 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5088 धावा केल्या आहेत. यादरम्यान सायमंड्सने 6 शतके आणि 30 अर्धशतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये अष्टपैलू कामगिरी करताना त्याने 133 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 26 कसोटीमध्ये 1462 धावा आहेत तसेच 24 विकेटही आहेत. सायमंड्सने 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. देशांतर्गत सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.
अँड्र्यू सायमंड्स 1998 ते 2009 या काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा भाग होता. यादरम्यान, स्टीव्ह वॉ आणि नंतर रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली कांगारू टीम अजिंक्य मानला जात होता. सायमंड्सने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 26 कसोटी, 198 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले. त्याच्या नावावर कसोटीत 1462, वनडेमध्ये 5088 धावा आणि टी-20 मध्ये 337 धावा आहेत. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये 165 विकेट्स घेतल्या आहेत. आक्रमक शैली आणि मैदानावरील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यासाठी तो ओळखला जात असे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chennai, Gujarat Titans