जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : या दिवशी सुरू होणार आयपीएल! 4 ठिकाणीच रंगणार T20 चा थरार

IPL 2022 : या दिवशी सुरू होणार आयपीएल! 4 ठिकाणीच रंगणार T20 चा थरार

IPL 2022 : या दिवशी सुरू होणार आयपीएल! 4 ठिकाणीच रंगणार T20 चा थरार

क्रिकेटच्या चाहत्यांना लवकरच गुड न्यूज मिळणार आहे. देशभरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. भारत-वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातल्या सीरिजमधून देशात क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल 2022 ची (IPL 2022) सुरूवात 26 मार्चपासून होऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 फेब्रुवारी : क्रिकेटच्या चाहत्यांना लवकरच गुड न्यूज मिळणार आहे. देशभरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. भारत-वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातल्या सीरिजमधून देशात क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल 2022 ची (IPL 2022) सुरूवात 26 मार्चपासून होऊ शकते. आधी 27 मार्चपासून आयपीएलला सुरूवात होईल, असं सांगितलं जात होतं. प्रसारणकर्ता स्टार स्पोर्ट्स आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यात याबाबत चर्चा सुरू आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 10 टीम खेळणार आहेत. मागच्या आठवड्यात झालेल्या आयपीएल लिलावात 204 खेळाडूंवर सगळ्या टीमनी बोली लावली होती, तर 33 खेळाडूंना जुन्या 8 टीमनी आधीच रिटेन केलं होतं. म्हणजे यंदाच्या मोसमात एकूण 237 खेळाडू मैदानात उतरतील. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार स्टार स्पोर्ट्स 26 मार्च म्हणजेच शनिवारपासून स्पर्धा सुरू करण्यासाठी आग्रही आहे. शनिवारी स्पर्धा सुरू झाली तर रविवारी दोन मॅच होऊ शकतात, म्हणजेच पहिल्या दोन दिवसांमध्येच तीन मॅच झाल्या तर याचा फायदा प्रसारणकर्त्यांना होऊ शकतो. रविवारी स्पर्धा सुरू झाली तर हे शक्य नाही, अशी माहिती फ्रॅन्चायजीच्या एका अधिकाऱ्याने दिली. 20 फेब्रुवारीला पाठवावं लागणार शेड्यूल बोर्डाकडून सगळ्या फॅन्चायजींना 20 फेब्रुवारीपर्यंत शेड्यूल पाठवायला सांगण्यात आलं होतं, पण आता याला आणखी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने अजून आयपीएल कुठे खेळवली जाणार, याची घोषणा केलेली नाही. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे लीग राऊंडचे सामने महाराष्ट्रात व्हायची शक्यता आहे. वानखेडे, ब्रेबॉर्न, डीवाय पाटील आणि पुणे या चार मैदानांमध्ये आयपीएलच्या मॅच खेळवल्या जाण्याची शक्यता आहे. पण 10 टीमना सरावासाठी मैदान उपलब्ध करणं मोठं आव्हान आहे, यासाठी एमसीए (MCA) तयारी करत आहे. 19 मार्च ते 7 जूनची तयारी प्रसारणकर्ता स्टार स्पोर्ट्सने कॉमेंटेटर्सना 19 मार्च ते 7 जूनपर्यंत तयार राहायला सांगण्यात आलं आहे. एवढी मोठी स्पर्धा असल्यामुळे त्यांना एक आठवडा आधी बोलावण्यात येणार आहे, तसंच स्पर्धे संपायच्या 5 दिवसांनंतरही त्यांना थांबायला सांगण्यात आलं आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) चा मोसम कोरोनामुळे प्रभावित झाला होता. आयपीएलचा पहिला राऊंड भारतात तर दुसरा राऊंड युएईमध्ये पार पडला, तर आयपीएल 2020 चं संपूर्ण आयोजन युएईमध्येच झालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात