मुंबई, 6 एप्रिल : लेखिका तस्लीमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीबद्दल (Moeen Ali) वादग्रस्त ट्वीट केलं आहे. तस्लीमा नसरीन यांच्या या ट्वीटनंतर त्यांच्यावर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंसह क्रिकेट चाहत्यांनीही टीका केली आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून (CSK) खेळणाऱ्या मोईन अलीने आपल्या जर्सीवर दारूची जाहिरात करण्यात येऊ नये, अशी विनंती चेन्नईच्या टीमला केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. चेन्नईच्या टीमनेही मोईन अलीची ही विनंती मान्य केली. यावर प्रतिक्रिया देताना तस्लीमा नसरीन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘मोईन अली क्रिकेटमध्ये राहिला नसता, तर त्याने सिरियामध्ये जाऊन आयसिसमध्ये प्रवेश केला असता,’ असं ट्वीट तस्लीमा नसरीन यांनी केलं.
चेन्नईच्या टीमने मात्र मोईन अलीने अशी कोणतीही विनंती केली नसल्याचं स्पष्ट केलं, पण तस्लीमा नसरीन यांच्या या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटायला लागले. मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यावर मात्र तस्लीमा नसरीन यांनी सारवासारव केली. माझं ट्वीट उपरोधिक असल्याचं नसरीन म्हणाल्या.
Sarcastic ? No one is laughing , not even yourself , the least you can do is delete the tweet https://t.co/Dl7lWdvSd4
— Jofra Archer (@JofraArcher) April 6, 2021
Can’t believe I’ve just seen that tweet about Moeen Ali, some people really are disgusting.
— Kieran (@kieran_cricket) April 6, 2021
तस्लीमा नसरीन यांच्या या वक्तव्यावर इंग्लंडचा क्रिकेटपटू जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) टीका केली. ‘तू बरी आहेस का? मला तरी तू बरी वाटत नाहीस. उपरोधिक? या ट्वीटवर कोणीही हसत नाहीये, तू देखील नाही. कमीत कमी तू हे ट्वीट डिलीट करू शकतेस,’ असं जोफ्रा आर्चर म्हणाला.