मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाची घुसखोरी, तरी होणार आजचा सामना, कारण...

IPL 2021 : आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाची घुसखोरी, तरी होणार आजचा सामना, कारण...

आयपीएलमध्ये (IPL 2021) पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने घुसखोरी केली आहे. सनरायजर्स हैदराबादचा (SRH) डावखुरा फास्ट बॉलर टी नटराजन (T Natrajan Corona Positive) याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.

  • Published by:  Shreyas

दुबई, 22 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या पहिल्या राऊंडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे स्पर्धा मे महिन्यात स्थगित करण्यात आली. यानंतर 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात झाली, पण तिसऱ्या मॅचनंतरच आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने घुसखोरी केली आहे. सनरायजर्स हैदराबादचा (SRH) डावखुरा फास्ट बॉलर टी नटराजन (T Natrajan Corona Positive) याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. नटराजन याची आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबतचं प्रसिद्धी पत्रक आयपीएलच्या ट्विटर अकाऊंटवरून शेयर करण्यात आलं आहे.

नटराजन याच्याबरोबरच त्याच्या संपर्कात आलेल्या सहा जणांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. यामध्ये विजय शंकर, टीम मॅनेजर विजय कुमार, फिजियो श्याम सुंदर जे, टीम डॉक्टर अंजना वन्नन, लॉजिस्टिक्स मॅनेजर तुषार खेडकर आणि नेट बॉलर पेरियासामी गनेसन यांचा समावेश आहे.

IPL 2021 मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव! SRH च्या खेळाडूला लागण

सनरायजर्स हैदराबादच्या इतर सदस्यांचीही आरटी-पीसीआर टेस्ट आज पहाटे पाच वाजता करण्यात आली, यात सगळ्यांचे रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज संध्याकाळी होणारा हैदरबाद आणि दिल्ली यांच्यातला सामना वेळत सुरू होणार आहे, असं आयपीएलने सांगितलं आहे.

याआधी टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातही (India tour of England) कोरोनाचा शिरकाव झाला होता. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, बॉलिंग कोच भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट रद्द (India vs England 5th Test Cancel) करण्यात आली. पाचव्या टेस्टआधी झालेल्या आरटी-पीसीआरमध्ये सगळ्या खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती, तरी भारतीय खेळाडूंनी पाचवी टेस्ट खेळायला नकार दिला.

First published:

Tags: Coronavirus, IPL 2021, SRH