जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : भारताला मिळाला वेगाचा बादशाह, वकार युनूससारखी बॉलिंग ऍक्शन, पाहा VIDEO

IPL 2021 : भारताला मिळाला वेगाचा बादशाह, वकार युनूससारखी बॉलिंग ऍक्शन, पाहा VIDEO

IPL 2021 : भारताला मिळाला वेगाचा बादशाह, वकार युनूससारखी बॉलिंग ऍक्शन, पाहा VIDEO

यंदाच्या आयपीएलमध्येही (IPL 2021) अनेक तरुणांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सनरायजर्स हैदराबादचा (SRH) फास्ट बॉलर उमरान मलिकही (Umran Malik) यातलाच एक.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 ऑक्टोबर : आयपीएलमुळे (IPL) भारताला अनेक दिग्गज क्रिकेटपटू मिळाले. जगातली सगळ्यात मोठी लीग असलेल्या या स्पर्धेत युवा भारतीय खेळाडूंना दिग्गजांसमोर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. यंदाच्या आयपीएलमध्येही (IPL 2021) अनेक तरुणांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सनरायजर्स हैदराबादचा (SRH) फास्ट बॉलर उमरान मलिकही (Umran Malik) यातलाच एक. 21 वर्षांच्या या फास्ट बॉलरने फक्त दोनच आयपीएल सामने खेळले आहेत. आरसीबीविरुद्धच्या (RCB vs SRH) मॅचमध्ये उमरान मलिकने 150 किमी प्रती तासापेक्षा जास्तच्या वेगाने लागोपाठ 5 बॉल टाकले. 152.95 किमी प्रती तासाच्या वेगाने उमरानने टाकलेला बॉल या आयपीएल मोसमातला सगळ्यात वेगवान बॉल आहे. आयपीएल इतिहासात सगळ्यात जलद बॉल टाकणारा भारतीय होण्याचा विक्रमही उमरानने केला आहे. उमरानची बॉलिंग एक्शन पाकिस्तानचा महान फास्ट बॉलर वकार युनूसशी (Waqar Younis) मिळती जुळती आहे.

जाहिरात

हैदराबादकडून खेळताना पदार्पणाच्या सामन्यातच उमरान मलिकने 24 पैकी 11 बॉल 145 किमी प्रती तासापेक्षा जास्तच्या वेगाने टाकले. उमरानला एकही विकेट मिळाली नाही, तरी त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 27 रन दिले. तर बँगलोरविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये 21 रन देऊन श्रीकर भरतची विकेट घेतली. जम्मू-काश्मीरचा Umran Malik बनला वेगाचा बादशाह; विराटने दिलं खास गिफ्ट भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष के श्रीकांत यांनीही उमरानचं कौतुक केलं आहे. उमरान मलिकला उत्कृष्ट फास्ट बॉलर बनवता येईल, असं श्रीकांत त्यांचं युट्यूब चॅनल ‘चीका चीका’ वर म्हणाले. मलिकचा रन अप पाकिस्तानच्या वकार युनूसची आठवण करून देतो. उमरानच्या बॉलिंगसमोर नितीश राणा संघर्ष करताना दिसला, तसंच केकेआरच्या बॅटिंगमधली कमजोरीही यातून दिसली, असं वक्तव्य श्रीकांत यांनी केलं. उमरान मलिकने टी-20 क्रिकेटमध्ये याच वर्षी पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत उमरान जम्मू-काश्मीरकडून खेळला. मलिकला कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात फास्ट बॉलर संदीप शर्माऐवजी संधी देण्यात आली. मलिकने जम्मू-काश्मीरकडून एक लिस्ट ए आणि एकच टी-20 मॅच खेळली आहे आणि त्याला एकूण 4 विकेट मिळाल्या आहेत. मलिकही बुमराहप्रमाणेच टेनिस बॉलने खेळून मोठा झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021 , SRH
  • First Published :
जाहिरात
जाहिरात