मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : एकही मॅच न खेळता श्रेयस अय्यरला मिळणार 7 कोटी! वाचा काय आहे कारण

IPL 2021 : एकही मॅच न खेळता श्रेयस अय्यरला मिळणार 7 कोटी! वाचा काय आहे कारण

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)  आयपीएलच्या 14 व्या सिझनमधून (IPL 2021) आऊट झाला आहे. या आयपीएल सिझनमध्ये एकही मॅच न खेळता श्रेयस अय्यरला त्याचे पूर्ण मानधन म्हणजेच 7 कोटी रुपये मिळणार आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 2 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आयपीएलच्या 14 व्या सिझनमधून (IPL 2021) आऊट झाला आहे. श्रेयस खांद्याच्या दुखापतीमुळे ही स्पर्धा खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये ऋषभ पंतची (Rishabh Pant) दिल्लीच्या कॅप्टनपदी निवड झाली आहे. या आयपीएल सिझनमध्ये एकही मॅच न खेळता श्रेयस अय्यरला त्याचे पूर्ण मानधन म्हणजेच 7 कोटी रुपये मिळणार आहेत.

हे कसं शक्य आहे?

श्रेयस अय्यरचं एका आयपीएल सिझनसाठी 7 कोटी मानधन आहे. यंदाही त्याला 'प्लेयर इन्शूरन्स' मुळे संपूर्ण मानधन मिळणार आहे. BCCI च्या प्लेयर इन्शूरन्समध्ये टीम इंडियाचे ज्या खेळाडूंचा कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये समावेश आहे. त्यांना  प्लेयर इन्शूरन्स' योजनेनाचा लाभ मिळतो. आयपीएल 2011  स्पर्धेच्या वेळी ही योजना सुरु झाली आहे. या योजनेनुसार दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धा न खेळल्यास खेळाडूंना भरपाई दिली जाते.

कोणताही खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करताना जखमी झाला असेल आणि त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये खेळता आलं नाही तर त्याला या योजनेचा लाभ मिळतो. श्रेयस भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील वन-डे मालिकेच्या दरम्यान जखमी झाला होता. त्यामुळे तो आता या योजनेचा लाभार्थी झाला आहे. यापूर्वी  इशांत शर्मा, झहीर खान आणि आशिष नेहरा यांना या योजनेचा फायदा मिळाला आहे.

श्रेयस अय्यरच्या खांद्याचे ऑपरेशन 8 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. तो या टी20 वर्ल्ड कपपूर्वी फिट होईल अशी आशा आहे.

एबी डीव्हिलियर्सनं निवडली IPL टीम, विराट कोहली नाही तर 'हा' आहे कॅप्टन! )

श्रेयसच्या पंतला शुभेच्छा

ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन केल्याबद्दल श्रेयसनं आनंद व्यक्त केला आहे. 'कॅप्टन म्हणून पंत बेस्ट आहे. मी खांद्याच्या दुखापतीनं त्रस्त आहे. दिल्ली कॅपिटल्सला या आयपीएलसाठी कॅप्टनची गरज होती. ऋषभ पंत कॅप्टन म्हणून योग्य आहे, यामध्ये मला कोणताही शंका नाही. आमच्या जबरदस्त टीमसोबत अद्भुत गोष्टी करण्यासाठी माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत. मी टीमला खूप मिस करेल. संपूर्ण स्पर्धेत मी आमच्या टीमला चिअर करणार आहे.' असं अय्यरनं स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Cricket, Delhi capitals, IPL 2021, Shreyas iyer