मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

एबी डीव्हिलियर्सनं निवडली IPL टीम, विराट कोहली नाही तर 'हा' आहे कॅप्टन!

एबी डीव्हिलियर्सनं निवडली IPL टीम, विराट कोहली नाही तर 'हा' आहे कॅप्टन!

दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्फोटक बॅट्समन एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) याने त्याची ऑल टाईम IPL टीम निवडली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 2 एप्रिल : दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्फोटक बॅट्समन एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) याने त्याची 'ऑल टाईम आयपीएल टीम' निवडली आहे. विशेष म्हणजे त्यानं या टीमच्या कॅप्टनपदी विराट कोहलीची (Virat Kohli) नाही तर महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) निवड केली आहे. डीव्हिलियर्सनं या टीममध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याची देखील निवड केली आहे.

डीव्हिलियर्सनं 169 आयपीएल मॅचमध्ये जवळपास 40 च्या सरासरीनं आणि 151 च्या स्ट्राईक रेटनं 4849 रन काढले आहेत. यामध्ये तीन शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. डीव्हिलियर्सला अजून एकदाही आयपीएल विजेतेपद जिंकण्यात मात्र अपयश आले आहे.  तो 2011 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) सदस्य आहे.

कोणत्या खेळाडूंचा टीममध्ये समावेश?

डीव्हिलियर्सनं त्याच्या टीममध्ये ओपनर म्हणून वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्माची निवड केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. चौथ्या क्रमांकावर त्यानं स्वत:सह केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ यांना निवडले आहे. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी असून तोच कॅप्टन आणि विकेट किपर आहे.

( वाचा : 46 पट जास्त किंमतीत खरेदी केलेल्या खेळाडूला CSK च्या अंतिम 11 मध्ये जागा नाही )

ऑल राऊंडर म्हणून टीममध्ये रवींद्र जडेजा आणि बेन स्टोक्सची निवड केली आहे. त्याचबरोबर त्यानं या टीममध्ये राशिद खान, भुवनेश्वर कुमार, कागिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या टीममध्ये आयपीएलमधील दिग्गज बॉलर लसिथ मलिंगाचा समावेश डीव्हिलियर्सनं केलेला नाही.

एबी डीव्हिलियर्सची आयपीएल 11 :  वीरेंद्र  सेहवाग, रोहित शर्मा, विराट कोहली, केन विल्यमसन/स्टीव्ह स्मिथ/एबी डीव्हिलियर्स, बेन स्टोक्स, महेंद्रसिंह धोनी ( कॅप्टन आणि विकेट किपर), रवींद्र जडेजा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, कागिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराह

First published:

Tags: Cricket, IPL 2021, MS Dhoni, Virat kohli