मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : KKR ला सगळ्यात मोठा धक्का, महत्त्वाच्या खेळाडूची आयपीएलमधून माघार

IPL 2021 : KKR ला सगळ्यात मोठा धक्का, महत्त्वाच्या खेळाडूची आयपीएलमधून माघार

आयपीएल 2021 चे (IPL 2021) उरलेले 31 सामने युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) शनिवारीच याची घोषणा केली. यानंतर लगेचच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमला मोठा धक्का बसला आहे.

आयपीएल 2021 चे (IPL 2021) उरलेले 31 सामने युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) शनिवारीच याची घोषणा केली. यानंतर लगेचच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमला मोठा धक्का बसला आहे.

आयपीएल 2021 चे (IPL 2021) उरलेले 31 सामने युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) शनिवारीच याची घोषणा केली. यानंतर लगेचच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई, 30 मे : आयपीएल 2021 चे (IPL 2021) उरलेले 31 सामने युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) शनिवारीच याची घोषणा केली. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे 4 मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आली होती, तेव्हा 60 पैकी 29 सामने झाले होते. आयपीएलचे उरलेले सामने झाले नाहीत, तर बोर्डाला 2,500 कोटी रुपयांचं नुकसान होईल, असं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी सांगितलं होतं.

एकीकडे आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन करण्याची तयारी बीसीसीआय करत असतानाच कोलकाताच्या टीमला (KKR) धक्का लागला आहे. टीमचा स्टार खेळाडू आणि फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएलचा उरलेला मोसम खेळणार नाही. कोलकात्याच्या टीमसाठी हा दुहेरी धक्का आहे, कारण या मोसमात टीमने चांगली कामगिरी केली नाही. 7 सामन्यांमध्ये त्यांना फक्त 2 मॅचच जिंकता आल्या, तर 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता सातव्या क्रमांकावर आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार पॅट कमिन्स आयपीएलचे उरेलेले सामने खेळणार नाही. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मिळून जवळपास 40 ऑस्ट्रेलियन आयपीएलचा भाग आहेत. ऑस्ट्रेलियाची टीम जून महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर ते अफगाणिस्तानविरुद्ध एक टेस्ट खेळतील. यानंतर ऍशेस सीरिज होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावरही पॅट कमिन्सला आराम देण्यात आला आहे. कमिन्सशिवाय ऑस्ट्रेलियाच्या अन्य खेळाडूंच्या आयपीएल खेळण्याबाबतही संशय आहे.

पॅट कमिन्सला केकेआलने 15.50 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं, त्यामुळे आता कमिन्स उरलेले सामने खेळला नाही, तर त्याला अर्धेच पैसे मिळतील. कमिन्सने आयपीएलच्या 37 मॅचमध्ये 38 विकेट घेतल्या. तर बॅटिंगमध्ये त्याने दोन अर्धशतकं केली.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर एश्ले जाईल्स यांनी इंग्लंडचे क्रिकेटपटू आयपीएलच्या उरलेल्या मॅच खेळणार नाहीत, असं सांगितलं. त्यामुळे जर इंग्लंडचे खेळाडू उपलब्ध झाले नाहीत, तर केकेआरला दुसरा कर्णधारही शोधावा लागेल. कोलकात्याच्या टीमने इंग्लंडच्या इयन मॉर्गनला (Eoin Morgan) कॅप्टन्सीची जबाबदारी दिली आहे. बीसीसीआयने मात्र परदेशी खेळाडू उपलब्ध करण्याबाबात वेगवेगळ्या बोर्डांशी चर्चा करू असं सांगितलं आहे.

दुसरीकडे कोलकात्याचा आणखी एक स्टार खेळाडू सुनील नारायण (Sunil Narine) हादेखील आयपीएलच्या सुरुवातीच्या काही मॅचसाठी उपलब्ध होऊ शकत नाही. कॅरेबियन प्रीमियर लीग 28 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. बीसीसीआय ही स्पर्धा 10 दिवस आधी खेळवण्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासोबत चर्चा करत आहे.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, KKR