Home /News /sport /

IPL 2021: आऊट झाल्यानंतर भडकला विराट, सहकाऱ्यांनाही बसला धक्का VIDEO

IPL 2021: आऊट झाल्यानंतर भडकला विराट, सहकाऱ्यांनाही बसला धक्का VIDEO

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या (Sunrisers Hyderabad) मॅचमध्ये देखील त्याचं हे रुप दिसलं.

    चेन्नई, 14 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या (Sunrisers Hyderabad) मॅचमध्ये देखील त्याचं हे रुप दिसलं. या मॅचमध्ये चांगला सेट झालेला कोहली 33 रनवर आऊट झाला. विराट आऊट झाल्यामुळे चांगलाच निराश झाला होता. डगआऊटमझ्ये जाताच त्यानं तेथील खूर्चीला बॅट मारली. कोहलीचं हे वर्तन पाहून तिथं उपस्थित असलेल्या त्याच्या टीममधील सहकाऱ्यांना देखील धक्का बसला. जेसन होल्डरच्या बॉलिंगवर मोठा शॉट मारण्याचा विराटचा प्रयत्न फसला. त्यानं मारलेला फटका बराच उंच गेला. विजय शंकरनं कोहलीचा चांगला कॅच पकडला. त्यानंतर डगआऊटमध्ये गेल्यानंतर विराटचा संताप बाहेर आला. त्यानं तिथं असलेल्या रिकाम्या खूर्चीला बॅट मारली. त्यावेळी तिथं आरसीबीच्या टीममधील सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांना विराट असं काही करेल यांची कल्पना नव्हती. त्यामुळे ते देखील काही काळ स्तब्ध झाले. विराटच्या संतापाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. गंभीरही नाराज विराटनं हैदरबाद विरुद्धच्या मॅचमध्ये टॉसनंतर केलेल्या वक्तव्यावर गंभीरला धक्का बसला आहे. "आम्हाला पहिल्यांदा बॅटींग करायची होती आणि तिसऱ्या क्रमांकावर शाहबाज अहमद खेळणार आहे." असं विराटनं टॉस झाल्यानंतर लगेच सांगितलं होतं. त्यावर गंभीरनं प्रश्न उपस्थित केला आहे. गौतम गंभीरनं 'स्टार स्पोर्ट्स'वर कॉमेंट्री दरम्यान सांगितले की "मी पहिल्यांदा असा कॅप्टन पाहिला आहे की तो 3 नंबरला कोण बॅटींग करणार आहे हे सांगत आहे." IPL 2021: शाहरुख खानच्या नाराजीवर आंद्रे रसेलनं दिलं उत्तर, म्हणाला... विराट कोहलीनं शाहबाज अहमदला 3 नंबरवर बॅटींग करण्याची संधी दिली. मात्र शाहबाजला 10 बॉलमध्ये 14 रनच काढता आले. चांगल्या सुरुवातीनंतर शाहबाज नदीमच्या बॉलवर आऊट झाला. तो पहिल्या मॅचमध्ये देखील फ्लॉप ठरला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, RCB, Viral video., Virat kohli

    पुढील बातम्या