चेन्नई, 6 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. गतविजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यात यावर्षीचा पहिला सामना रंगेल. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ही मॅच होईल. मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. 13 पैकी 5 आयपीएलमध्ये मुंबईचा विजय झाला, तर विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीला एकदाही आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलेलं नाही.
मुंबईविरुद्धच्या मॅचआधी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. 'आरसीबीच्या चाहत्यांनो आम्ही परत आलो आहेत. रेड आणि गोल्ड ब्रिगेडचं प्रतिनिधीत्व करणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मोठा मुकाबला आमची वाट बघतोय. ओपनिंग मॅचमध्ये आम्ही मुंबई इंडियन्सशी भिडणार आहोत. आम्हाला विजयाचा मंत्र सांगा,' असं ट्वीट विराट कोहलीने केलं आहे.
Hey RCB fans! We are back, proudly representing the red & gold brigade. A cracking contest awaits us as we face MI in our opening clash of #VIVOIPL. Tell me your mantra to #PlayBold using #KohliMantra. Mark your calendars – April 9, 7:30 PM. The heat is on! 🔥 #SabKuchRoKo
— Virat Kohli (@imVkohli) April 6, 2021
आयपीएलच्या मागच्या मोसमात आरसीबी चौथ्या क्रमांकावर होती. 2009, 2011 आणि 2016 साली बँगलोरची टीम फायनलमध्ये पोहोचली होती, पण त्यांना एकदाही स्पर्धा जिंकता आली नाही.
विराट कोहलीच्या प्रश्नावर चाहत्यांनीही मजेदार प्रतिक्रिया दिल्या. मुंबई आणि बँगलोर यांच्यात आतापर्यंत 27 सामने झाले आहेत, यातल्या 17 मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला, तर बँगलोरला फक्त 10 मॅचमध्ये विजय मिळवता आला. दुसरीकडे कॅप्टन्सीमध्येही विराटपेक्षा रोहित शर्माचं (Rohit Sharma) रेकॉर्ड चांगलं आहे. रोहित शर्माने मुंबईला 5 वेळा आयपीएल जिंकता आली. यावेळी विजयाची हॅट्रीक साधण्यासाठी मुंबईची टीम मैदानात उतरेल. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट पहिल्या क्रमांकावर आहे, पण कर्णधार म्हणून त्याला फारसं यश मिळालेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Mumbai Indians, RCB, Rohit sharma, Virat kohli