मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: आर अश्विनची आयपीएलमधून माघार; Tweet करत सांगितलं कारण

IPL 2021: आर अश्विनची आयपीएलमधून माघार; Tweet करत सांगितलं कारण

IPL 2021: आयपीएलमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटलचा स्टार गोलंदाज आर अश्विनच्या कुटुंबाला  कोरोनाची बाधा झाल्याने त्याने आयपीएलच्या 14 व्या मोसमातून (IPL 2021) माघार ( R Ashwin take break) घेतली आहे.

नवी दिल्ली, 26 एप्रिल: सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत घातक ठरत आहे. त्यामुळे देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. तर दुसरीकडे रुग्णालयेही रूग्णांनी खचाखच भरली आहेत. प्रत्येकजण औषधं, बेड आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच बहुतांशी राज्यात लॉकडाऊनही लादण्यात आलं आहे. या सर्वाचा परिणाम सध्या आयपीएलवरही होताना दिसत आहे.

दरम्यान, आयपीएलमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुटुंबातील लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने दिल्ली कॅपिटलचा स्टार गोलंदाज आर अश्विनने आयपीएलच्या 14 व्या मोसमातून (IPL 2021) माघार ( R Ashwin take break) घेतली आहे. त्याने ट्विट करून याबाबतची माहिती दिली असून आपल्या कुटुंबातील काही जणांना कोरोनाची (R ashwin Family infected with corona virus) बाधा झाली असल्याची माहितीही त्याने यावेळी दिली आहे. अश्विनने ट्विटमध्ये  म्हटलं की, मी उद्या (मंगळवार) पासून चालू आयपीएलमधून माघार घेत आहे. माझं कुटुंब सध्या कोविड 19 विषाणूशी झगडा करत आहे. त्यामुळे या कठीण काळात मला त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. जर गोष्टी पहिल्यासारख्या झाल्या तर मी पुन्हा आयपीएल खेळण्याची आशा आहे.

5 सामन्यांत आर अश्विनने मिळवली एकच विकेट

काल सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सुपर ओव्हर सामना जिंकल्यानंतर अश्विननं हे ट्विट केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सची पुढची भिडत 27 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. त्यासामन्यात आर अश्विनविना दिल्लीला मैदानात उतरावं लागणार आहे. कालच्या विजयानंतर दिल्ली आता गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचली आहे. असं असलं तरी आर अश्विनने गेल्या पाच सामन्यात केवळ एकच बळी पटकावला आहे. त्याला चार सामन्यात एकही बळी मिळवता आला नाही.

हे ही वाचा-IPL 2021 : कोरोना पॉझिटिव्ह ते मॅच विनर, बापूची 'सुपर' कामगिरी

काल झालेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्सच्या बदल्यात 159 रन्स केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादलाही निर्धारित ओव्हरमध्ये 159 रन्स करता आल्या. त्यामुळे सामना अधिक रंजक बनला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच्या कॅपिटलने हैदराबादला धोबीपछाड दिला आहे. पण या सामन्यात अश्विनला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने 4 ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या आहेत.

First published:

Tags: IPL 2021, R ashwin