नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर: आयपीएल २०२१ लीगचा (IPL2021) 56वा सामना हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात(srh VS mi) रंगला आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्याचा हा निर्णय सार्थक ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा आणि इशान किशनने मुंबईसाठी सुरुवात केली. इशान किशनने आक्रमक खेळी करत ओपनिंगमध्येच आपले अर्धशतक झळकावले. त्याला सर्वात जलद आयपीएल अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
मुंबईकडून इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्माने सलामीला फलंदाजी केली. इशान किशनने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला. त्याने चौकार षटकारांची बरसात करत १६ चेंडूत अर्धशतक केले. या खेळीत ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.
तो सर्वात जलद आयपीएल अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सुरेश रैनासह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत १४ चेंडूतील अर्धशतकासह केएल राहुल अव्वल क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या सुनील नारायण आणि युसूफ पठाण आहेत. त्यांनी प्रत्येकी १५ चेंडूत अर्धशतक केले होते.
Man on a mission, Mr. @ishankishan51! 👏 👏
A 16-ball half-century for the @mipaltan left-hander. 🙌 🙌 #VIVOIPL #SRHvMI Follow the match 👉 https://t.co/STgnXhy0Wd pic.twitter.com/muvfkGd8mF — IndianPremierLeague (@IPL) October 8, 2021
आयपीएल २०२१ स्पर्धेत जलद अर्धशतक झळकावणारे खेळाडू
इशान किशन (मुंबई विरुद्ध हैदराबाद) १६ चेंडूत ५० धावा
किरोन पोलार्ड (मुंबई विरुद्ध चेन्नई) १७ चेंडूत ५० धावा
पृथ्वी शॉ (दिल्ली विरुद्ध कोलकाता)१८ चेंडूत ५० धावा
यशस्वी जैस्वाल (राजस्थान विरुद्ध चेन्नई) १९ चेंडूत ५० धावा
मनिष पांडे (हैदराबाद विरुद्ध चेन्नई) ३५ चेंडूत ५० धावा
प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबईला हैदराबादवर १७१ धावांनी चमत्कारिक विजय मिळवावा लागणार आहे, तरच ते निव्वळ धावगतीच्या जोरावर प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ishan kishan, Mumbai Indians