• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'वरुण चक्रवर्ती झहीरच्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल', दिग्गज बॉलरला विश्वास

'वरुण चक्रवर्ती झहीरच्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल', दिग्गज बॉलरला विश्वास

मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy)टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात (T20 World Cup Team India) स्थान मिळालं आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडमध्येही वरुणने धमाक्यात सुरुवात केली आहे.

 • Share this:
  अबु धाबी, 21 सप्टेंबर : मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy)टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात (T20 World Cup Team India) स्थान मिळालं आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडमध्येही वरुणने धमाक्यात सुरुवात केली आहे. बँगलोरविरुद्धच्या (RCB) सामन्यात कोलकात्याच्या (KKR) या स्पिनरने 4 ओव्हरमध्ये फक्त 13 रन देऊन 3 विकेट घेतल्या. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणला (Irfan Pathan) वरुण चक्रवर्तीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. वरुण टी-20 वर्ल्ड कपमध्ये झहीर खानने (Zaheer Khan) 2011 वर्ल्ड कपमध्ये जशी कामगिरी केली, तशीच करू शकतो, असं इरफान पठाण म्हणाला आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना इरफान पठाण म्हणाला, 'झहीर खानने 2011 वर्ल्ड कपदरम्यान नकलबॉलचा उपयोग करायला सुरुवात केली. त्याआधी तो असं करायचा नाही. झहीरचा हा बॉल सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक होता. नवीन गोष्ट टीमसाठी कायमच लाभदायक असते, मग तो बॉल असो किंवा खेळाडू. वरुण चक्रवर्तीसोबतही असंच आहे.' 1983 नंतर 2011 साली भारताने 50 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला होता. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये झहीर खानने 21 विकेट घेतल्या. 9 सामन्यांमध्ये 21 च्या सरासरीने झहीरने ही कामगिरी केली. एवढच नाही तर त्याचा इकोनॉमी रेटही 5 पेक्षा कमी होता. 2011 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये झहीर संयुक्तरित्या टॉपवर होता. झहीरएवढ्या विकेट कोणत्याही फास्ट बॉलरला घेता आल्या नव्हत्या. पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीलाही 21 विकेट मिळाल्या होत्या. कर्नाटकचा 30 वर्षांचा वरुण चक्रवर्ती आतापर्यंत फक्त 25 टी-20 मॅच खेळला आहे, पण आपल्या उत्कृष्ट कामगिरीने त्याने निवड समितीलाही प्रभावित केलं, याच कारणामुळे त्याची टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड झाली. वरुणने 23 च्या सरासरीने 30 विकेट घेतल्या, तसंच त्याचा इकोनॉमी रेटही 7 पेक्षा कमी आहे. 9 लिस्ट ए मॅचमध्ये त्याने 17 च्या सरासरीने 22 विकेट मिळवल्या, यात त्याचा इकोनॉमी रेट जवळपास 4 चा आहे.
  Published by:Shreyas
  First published: