Home /News /sport /

IPL Final 2021 : शाहरुखचे हिरो धोनीसमोर फेल! CSK चौथ्यांदा IPL Champion

IPL Final 2021 : शाहरुखचे हिरो धोनीसमोर फेल! CSK चौथ्यांदा IPL Champion

आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) फाफ डुप्लेसिसच्या (Faf Du Plessis) धडाकेबाज खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सने केकेआरला विजयासाठी 193 रनचं आव्हान दिलं आहे.

    दुबई, 15 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायर्डसचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला आहे. फाफ डुप्लेसिसच्या धडाकेबाज बॅटिंगनंतर रवींद्र जडेजाने बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये धमाका केला. जडेजाने 4 ओव्हरमध्ये 37 रन देऊन दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि शाकिब अल हसनची (Shakib Al Hasan) विकेट घेतली, सोबतच त्याने फिल्डिंगमध्येही व्यंकटेश अय्यर आणि सुनिल नारायण यांचे उत्कृष्ट कॅच पकडले. चेन्नईने दिलेलं 193 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला 20 ओव्हरमध्ये 165/9 पर्यंतच मजल मारता आली. व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांच्या जोडीने केकेआरला 91 रनची पार्टनरशीप करून दिली, पण यानंतर त्यांची बॅटिंग गडगडली. फाफ डुप्लेसिसच्या (Faf Du Plessis) धडाकेबाज खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सने केकेआरला विजयासाठी 193 रनचं आव्हान दिलं. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 192 रन केले. फाफ डुप्लेसिसने 59 बॉलमध्ये 86 रनची खेळी केली, यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता, तर मोईन अली 20 बॉलमध्ये 37 रनवर नाबाद राहिला. रॉबिन उथप्पाने 15 बॉलमध्ये 31 रन केले, तर ऋतुराज गायकवाड 27 बॉलमध्ये 32 रन करून आऊट झाला. कोलकात्याकडून सुनिल नारायणला 2 आणि शिवम मावीला एक विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात कोलकाता आणि चेन्नईने टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. आयपीएल इतिहासात आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्सने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, तर कोलकाता नाईट रायडर्सना दोन वेळा ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं आहे. लीग स्टेजनंतर पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम दुसऱ्या आणि कोलकाता चौथ्या क्रमांकावर राहिली. पहिल्या प्ले-ऑफमध्ये चेन्नईने दिल्लीचा पराभव करत फायनल गाठली, तर कोलकात्याने आरसीबी आणि दिल्लीचा पराभव केला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला. चेन्नई सुपर किंग्सची ही रेकॉर्ड नववी फायनल होती.

    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, KKR, MS Dhoni

    पुढील बातम्या