• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: 'ख्रिस मॉरीसची 16 कोटींची पात्रता नाही' दिग्गज क्रिकेटपटूनं सुनावलं

IPL 2021: 'ख्रिस मॉरीसची 16 कोटींची पात्रता नाही' दिग्गज क्रिकेटपटूनं सुनावलं

राजस्थान रॉयल्सची (RR) या आयपीएल सिझनमधील (IPL 2021) आत्तापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे. संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी ही टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 एप्रिल : राजस्थान रॉयल्सची (RR) या आयपीएल सिझनमधील (IPL 2021) आत्तापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे. संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी ही टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी आहे. राजस्थानला चार पैकी फक्त एका मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे. या आयपीएलपूर्वी राजस्थाननं मोठी तयारी केली होती. आयपीएल लिलावात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर ख्रिस मॉरीसला (Chris Morris) तब्बल 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले. आजवरच्या आयपीएल लिलावातील मॉरीस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मात्र मॉरीस या रकमेसाठी पात्र नाही, असं मत इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) याने व्यक्त केलं आहे. मॉरीसनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्धची मॅच जिंकून दिल्यानंतरही पीटरसननं हे मत व्यक्त केलं आहे, हे विशेष. पीटरसननं 'स्टार स्पोर्ट्स' वरील एका कार्यक्रमात सांगितलं की, " मॉरीस दक्षिण आफ्रिकेच्या टीमची पहिली पसंती नाही. त्याच्याकडून सर्वांच्या जास्त अपेक्षा आहेत. त्याच्याबद्दल खूप काही सांगितलं जात आहे, पण माझ्या मते तो सतत चांगली कामगिरी करु शकणारा खेळाडू नाही. त्याच्यात काहीही खास नाही. तो फक्त दोन मॅच चांगल्या खेळू शकतो, त्यानंतर पुढच्या मॅचमध्ये त्याची कामगिरी खराब असेल." पीटरसन इतक्यावरच थांबला नाही. तो पुढे म्हणाला, "राजस्थाननं मॉरीससाठी जास्तच पैसा खर्च केला. हे थोडं खराब वाटेल, पण माझ्या मते तो इतक्या पैशांसाठी पात्र नाही." कायरन पोलार्डच्या 'त्या'कृतीवर फॅन्स नाराज, कारवाईची केली मागणी आरसीबी विरुद्ध मॉरीस फेल ख्रिस मॉरीसनं गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये सपशेल निराशा केली. तो 7 बॉलमध्ये 10 रन काढून आऊट झाला. तर त्यानंतर त्यानं 3 ओव्हर्समध्ये 12.66 च्या इकॉनॉमी रेटनं 38 रन दिले. आरसीबी विरुद्ध त्याला एकही विकेट मिळाली नाही. देवदत्त पडिक्कल (101) आणि विराट कोहली (72) या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर आरसीबीनं राजस्थान रॉयल्सचा 10 विकेट्सनं पराभव केला.
  Published by:News18 Desk
  First published: