जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: कायरन पोलार्डच्या 'त्या'कृतीवर फॅन्स नाराज, कारवाईची केली मागणी

IPL 2021: कायरन पोलार्डच्या 'त्या'कृतीवर फॅन्स नाराज, कारवाईची केली मागणी

IPL 2021: कायरन पोलार्डच्या 'त्या'कृतीवर फॅन्स नाराज, कारवाईची केली मागणी

बॅट्समन्सची निराशाजनक कामगिरी हे मुंबईच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं. त्याचबरोबर मुंबईचा ऑल राऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याची एक कृती देखील अनेकांच्या नाराजीचं कारण ठरली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 24 एप्रिल : आयपीएल 2021 (IPL 2021) मधील 17 वा सामना मुंबई इंडियन्स  (MI) आणि पंजाब किंग्ज (PBKS) या दोन टीममध्ये झाला. पंजाबनं हा सामना 9 विकेट्सनं जिंकला.  बॅट्समन्सची निराशाजनक कामगिरी हे मुंबईच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं. त्याचबरोबर मुंबईचा ऑल राऊंडर कायरन पोलार्ड  (Kieron Pollard) याची एक कृती देखील अनेकांच्या नाराजीचं कारण ठरली आहे. काही क्रिकेट एक्स्पर्ट आणि फॅन्सनी याबद्दल पोलार्डवर कारवाईची मागणी केली आहे. मुंबईची बॅटींग सुरु होती तेंव्हा हा प्रकार घडला. पंजाबचा अनुभवी बॉलर मोहम्मद शमीची (Mohammed Shami) ओव्हर सुरु होती. शमीनं बॉल टाकण्यापूर्वीच नॉन स्ट्रायकरला असलेला पोलार्ड क्रिज सोडून बराच पुढं गेला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. या सर्व प्रकारावर टीम इंडियाचा माजी स्पिनर आणि आयपीएल कॉमेंट्री पॅनलचा सदस्य मुरली कार्तिक (Murali Karthik)  यानं नाराजी व्यक्त केली. त्यानं हे प्रकार थांबवण्यासाठी कडक नियम आणि दंडाची तरतूद करण्याची मागणी केली.  अनेक ट्विटर युझर्सनी देखील या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून त्यांनी पोलार्डची ही कृती खेळ भावनेला धक्का देणारी असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

News18

News18

ब्राव्होनं देखील हेच केलं होतं आयपीएल 2021 मधील हा पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात झालेल्या मॅचमध्ये देखील हा प्रकार घडला होता. त्यावेळी सीएसकेचा ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) राजस्थानचा फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमान यानं बॉल टाकण्याच्या पूर्वीच क्रिजच्या बाहेर होता. त्यावेळी कॉमेंट्री करणाऱ्या हर्षा भोगले यांनी ब्राव्होची ती कृती अयोग्य असल्याचं सांगितलं, आणि नियमांचे दाखले दिले. रोहित शर्मानं सांगितलं मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं कारण भारताचा माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यानंही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. बॉलरनं बॉल टाकण्याच्या आधाीच नॉन स्ट्रायकरला असलेल्या बॅट्समननं क्रिज सोडलं तर त्याला रन आऊट करण्याचा अधिकार बॉलरला आहे, असं मत प्रसादनं व्यक्त केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात