IPL 2021: नव्या कॅप्टनची कमाल, राजस्थान रॉयल्सनं सुधारली सर्वात मोठी चूक!

IPL 2021: नव्या कॅप्टनची कमाल, राजस्थान रॉयल्सनं सुधारली सर्वात मोठी चूक!

राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये राजस्थान रॉ़यल्सनं त्यांची मोठी चूक सुधारली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (DC vs RR) या मॅचमध्ये दिल्लीची सुरुवात खराब झाली आहे. त्यांच्या प्रमुख बॅट्समननं निराशा केली आहे. या मॅचमध्ये राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये राजस्थान रॉ़यल्सनं त्यांची मोठी चूक सुधारली आहे.

राजस्थान रॉयल्सनं या मॅचमध्ये अनुभवी जयदेव उनाडकतचा (Jaydev Undkat) समावेश केला आहे. सौराष्ट्रचा कॅप्टन असलेल्या जयदेवकडं मोठा अनुभव आहे. त्याचा फायदा राजस्थानला मिळाला. जयदेवनं सध्या जबरदस्त सुरुवातील फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला फक्त 2 रन वर आऊट केलं. त्यापाठोपाठ उनाडकतनं शिखर धवनला (Shikhar Dhawan)  9 रनवर आऊट करत दिल्लीला दुसरा मोठा धक्का दिला.

या दोन धक्क्यांमधून दिल्लीची टीम सावरण्यापूर्वी जयदेवनं अनुभवी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला देखील पॉवर प्ले संपण्यापूर्वी आऊट करत या मॅचमधील तिसरी विकेट घेतली. रहाणेनंतर दिल्लीचा ऑल राऊंडर मार्कस स्टॉईनिस याला देखील फार काळ खेळता आलं नाही. मुस्तफिजूरनं त्याला शून्यावर आऊट करत दिल्लीला चौथा धक्का दिला.

राजस्थान रॉयल्सच्या अचूक बॉलिंगमुळे दिल्लीची अवस्था 4 आऊट 37 अशी नाजूक झाली. मागील आयपीएलमध्ये जोफ्रा आर्चरचा अपवाद वगळता राजस्थानच्या बॉलर्सनी निराशा केली होती. त्यामुळे राजस्थान रॉयल्सनं 'पॉवर प्ले' मध्ये नेहमीच भरपूर रन दिले होते. मागील आयपीएलमधील ही चूक नवा कॅप्टन संजू सॅमसनच्या कॅप्टनसीमध्ये राजस्थाननं सुधारली आहे.

IPL 2021: विराट कोहलीला आदळाआपट भोवली! मॅच रेफ्रींनी घेतली गंभीर दखल

दोन्ही टीममध्ये दोन बदल

या मॅचसाठी दोन्ही टीमनं दोन बदल केले आहेत. राजस्थानचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्याच्या जागी डेव्हिड मिलरला(David Miller) संधी मिळाली आहे. तर श्रेयस गोपाळच्या जागी जयदेव उनाडकतचा समावेश करण्यात आला आहे. तर दिल्लीच्या टीममध्ये दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर अमित मिश्राच्या जागी ललित यादवला (Lalit Yadav) संधी मिळाली आहे.

Published by: News18 Desk
First published: April 15, 2021, 8:38 PM IST

ताज्या बातम्या