IPL 2021: विराट कोहलीला आदळाआपट भोवली! मॅच रेफ्रींनी घेतली गंभीर दखल

IPL 2021: विराट कोहलीला आदळाआपट भोवली! मॅच रेफ्रींनी घेतली गंभीर दखल

सनरायजर्स हैदराबाद विरोधात (SRH) विराट कोहलीनं 33 धावांची खेळी केली. जेसन होल्‍डरने विराट कोहलीला आऊट केले, विजय शंकरने कोहलीचा कॅच घेतला. 33 धावा करून पॅव्हेलियमध्ये परतलेल्या कोहलीला त्याचा राग अनावर झाला.

  • Share this:

चेन्नई, 15 एप्रिल: विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (Royal Challengers Bangalore) सनराइजर्स हैदराबादला (Sun Risers Hyderabad) धूळ चारत आयपीएल 2021 (IPL 2021) मधील दुसरा विजय मिळवला. तब्बल सात वर्षांनंतर विराटच्या टीमनं आयपीएल स्पर्धेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत.या मॅचनंतर आरसीबीचे खेळाडू तसंच फॅन्स विराटचं कौतुक करत आहेत. त्याचवेळी या मॅचच्या दरम्यान केलेल्या एका कृतीमुळे विराट अडचणीत आला आहे.

काय आहे प्रकरण?

सनरायजर्स हैदराबाद विरोधात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB vs SRH) कर्णाधार विराट कोहलीनं 33 धावांची खेळी केली. जेसन होल्‍डरने विराट कोहलीला आऊट केले, विजय शंकरने कोहलीचा कॅच घेतला. 33 धावा करून पॅव्हेलियमध्ये परतलेल्या कोहलीला त्याचा राग अनावर झाला, आणि त्याने रागाने त्याची बॅट खूर्चीवर आपटली. विराटचा हा राग पाहून त्याच्या टीममधील सहकारी देखील स्तब्ध झाले होते.

विराटला आता ही आदळाआपट भोवण्याची शक्यता आहे. आरसीबीचा कॅप्टन आयपीएल (IPL) आचारसंहिता भंग केल्याच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. त्यामुळे मॅच रेफ्री नारायण कुट्टी यांनी विराटला फटकारलं आहे. विराट लेव्हल एक प्रकारातील 2.2 कलमाच्या अंतर्गत दोषी आढळला आहे. क्रिकेट किंवा मैदानातील साहित्याचं नुकसान करणे किंवा त्याचा अपमान केल्यानंतर या नियमानुसार कारवाई करण्यात येते.यापूर्वी 2016 साली आरसीबीच्या विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) तेंव्हाचा कॅप्टन गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचा राग याच पद्धतीनं अनावर झाला होता. त्यावेळी त्याच्या मॅच फिसमधील 15 टक्के रकमेचा दंड आकारण्यात आला होता. आता विराटवर मॅच रेफ्री काय कारवाई करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

IPL 2021, DC Vs RR: दोन नवखे कर्णधार आमने-सामने, कोरोनामुळे दिल्लीला मोठा फटका

विराट कोहलीच्या संतापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर  अनेकांनी कोहलीला रागावर नियंत्रण मिळवण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी कोहलीने सांभाळून खेळले पाहिजे होते अशी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: April 15, 2021, 4:53 PM IST

ताज्या बातम्या