मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कोण आला रे कोण आला..! IPL गाजवलेल्या ऋतुराजचं पुण्यात जल्लोषात स्वागत, VIDEO

कोण आला रे कोण आला..! IPL गाजवलेल्या ऋतुराजचं पुण्यात जल्लोषात स्वागत, VIDEO

फोटो सौजन्य : BeingMarathi/ScreenCapture

फोटो सौजन्य : BeingMarathi/ScreenCapture

आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला चॅम्पियन बनवण्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) मोलाची कामगिरी केली.

  • Published by:  Shreyas
पुणे, 17 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला. याचसोबत एमएस धोनीच्या सीएसकेने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला चॅम्पियन बनवण्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) मोलाची कामगिरी केली. आयपीएलच्या या मोसमात सर्वाधिक रन केल्याबद्दल ऋतुराज गायकवाडला ऑरेंज कॅप मिळाली. आयपीएल गाजवून पुण्यात आल्यानंतर ऋतुराजचं फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आलं. ऋतुराज गायकवाड पुण्यातल्या जुन्या सावंगीमध्ये येताच त्याला ओवाळण्यात आलं. यावेळी फोटो काढण्यासाठी अनेक फोटोग्राफरही तिकडे उपस्थित होते, तसंच परिसरातल्या नागरिकांनीही त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
आयपीएलच्या या मोसमात ऋतुराजने 16 सामन्यांमध्ये 43.35 च्या सरासरीने आणि 136.26 च्या स्ट्राईक रेटने 635 रन केले. ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात लहान वयात ऑरेंज कॅप (IPL Orange Cap) जिंकणारा खेळाडू ठरला. यंदाच्या आयपीएलमधले सर्वाधिक रन करणारे खेळाडू 635 – ऋतुराज गायकवाड 633 – फाफ डुप्लेसिस 626 – केएल राहुल 587 – शिखर धवन 513 – ग्लेन मॅक्सवेल ऑरेंज कॅप एका मोसमात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. आयपीएलच्या या मोसमात ऋतुराज शानदार फॉर्ममध्ये होता. आयपीएल 2020 च्या अखेरच्या तीन मॅचमध्ये ऋतुराजने अर्धशतकं केली होती. यानंतर आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडमध्ये त्याने 88*, 38, 40, 45 आणि 101* रनची खेळ केली. दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर-1 मध्ये ऋतुराजने 70 रन केले आणि चेन्नईला फायनलमध्ये पोहोचवलं. विराटला टाकलं मागे सगळ्यात लहान वयात ऑरेंज कॅप मिळवत ऋतुराजने विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे. 24 वर्ष 257 दिवस – ऋतुराज गायकवाड- 2021 24 वर्ष 328 दिवस – शॉन मार्श- 2008 27 वर्ष 206 दिवस – विराट कोहली- 2016 27 वर्ष 292 दिवस – केन विलियमसन- 2018 IPL Final 2021 : सलमान खान झाला या दोन खेळाडूंचा फॅन, पहिला ऋतुराज गायकवाड तर दुसरा...
First published:

Tags: Csk, IPL 2021

पुढील बातम्या