मुंबई, 7 एप्रिल: आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचं (Chennai Super Kings) प्रदर्शन खूपच खराब होतं. चेन्नईच्या टीमला इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यात अपयश आलं होतं. महेंद्र सिंग धोनीच्या नेत्रृत्वातील चेन्नई सुपरकिंग्स टीम 7व्या क्रमांकावर पोहोचली होती. त्यानंतर आता आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी दावेदार मानलं जात नाहीये. त्यातच टीम इंडियाच्या तीन माजी क्रिकेटर्सने धोनीच्या टीम संदर्भात मोठा दावा केला आहे. गौतम गंभीर, आकाश चोपडा आणि संजय मांजरेकर यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत संवाद साधताना दावा केला आहे की, या हंगामातही चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफ गाठणार नाही. गौतम गंभीरने म्हटलं, चेन्नई या हंगामात पाचव्या क्रमांकावर राहील तर आकाश चोपडा आणि संजय मांजरेकर यांचेही मत आहे की, चेन्नई सुपर किंग्स पहिल्या चारमध्ये स्थान मिळवू शकणार नाही. प्रदर्शनात सुधारणा होईल पण… आकाश चोपडाने क्रिकइन्फोसोबत बोलताना म्हटलं, “चेन्नई सुपर किंग्स गेल्या मोसमातील कामगिरी निश्चितच सुधारेल पण प्लेऑफमधील जागा मिळवण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे.” पाहा : IPL 2021: ‘या’ राजवाड्यात राहतात मुंबई इंडियन्सचे खेळाडू, पाहा VIDEO इयान बिशपला चेन्नईवर विश्वास वेस्ट इंडिजचा माजी अनुभवी बॉलर इयान बिशप याला चेन्नई सुपर किंग्जकडून अपेक्षा आहेत. त्याने दावा केला आहे की, चेन्नई सुपर किंग्स नक्कीच प्लेऑफमध्ये प्रवेश करेल आणि टीम चौथ्या क्रमांकावर दाखल होण्याची अपेक्षा आहे. या मोसमात चेन्नईने आप्या टीममध्ये अनेक सर्वोत्कृष्ट प्लेअर्सचा समावेश केला आहे. सुरेश रैना या हंगामात परतला असून कृष्णप्पा गौतम, मोईन अली यांनाही टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. चेन्नई सुपर किंग्सची टीम महेंद्रसिंग धोनी (कॅप्टन), रॉबिन उथप्पा, सुरेश रैना, अंबाती रायडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डुप्लेसी, इमरान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगीडी, मिशेल सेंटनर, रवींद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम करेन, आर साई किशोर, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी हरी निशांत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.