• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: जोश हेजलवूडच्या जागी रोहितच्या जुन्या सहकाऱ्याची केली धोनीनं निवड

IPL 2021: जोश हेजलवूडच्या जागी रोहितच्या जुन्या सहकाऱ्याची केली धोनीनं निवड

आयपीएल स्पर्धा सुरु होण्याच्या काही दिवस आधी जोश हेजलवूड (Josh Hazlewood) या फास्ट बॉलरनं माघार घेतल्यानं चेन्नई सुपर किंग्सला (CSK) धक्का बसला होता. हेजलवूडचा बदली खेळाडू चेन्नईनं निश्चित केला आहे.

 • Share this:
  चेन्नई, 9 एप्रिल: आयपीएल स्पर्धा (IPL 2021) सुरु होण्याच्या काही दिवस आधी जोश हेजलवूड (Josh Hazlewood) या फास्ट बॉलरनं माघार घेतल्यानं चेन्नई सुपर किंग्सला (CSK) धक्का बसला होता. हेजलवूडच्या जागी चेन्नई कोणत्या खेळाडूला करारबद्ध करणार यावर मोठी चर्चा सुरु होती. दोन खेळाडूंनी चेन्नईला कोरोनाचं (Covid-19) कारण देत नकार दिल्याचं वृत्त देखील प्रसिद्ध झालं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर हेजलवूडचा बदली खेळाडू चेन्नईनं निश्चित केला आहे. जोश हेजलवूडच्या जागी त्याच्याच देशातील म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेसन बेहनड्रॉफचा (Jason Behrendorff) चेन्नईनं समावेश केला आहे. बेहनड्रॉफनं यापूर्वी 11 वन-डे आणि 7 टी20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याची ही दुसरी आयपीएल टीम आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) 2019 साली खेळला होता. त्या सिझनमध्ये त्यानं पाच मॅचमध्ये पाच विकेट्स घेतल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्सची पहिली मॅच 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सशी (CSK vs DC) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium, Mumbai) होणार आहे. हेजलवूडनं माघार का घेतली? हेजलवूडनं 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'च्या वेबसाईटशी बोलताना या स्पर्धेतील माघारीचं कारण दिलं आहे. 'बायो बबल आणि वेगवेगळ्या काळात क्वारंटाईन राहून 10 महिने उलटले आहेत. त्यामुळे मी सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. आम्हाला नंतरच्या कालावधीमध्येही बरंच क्रिकेट खेळायचं आहे,' असे त्याने स्पष्ट केले. ( IPL 2021, MI vs RCB: विराट कोहलीचं डावपेच येणार RCB च्या अंगलट, मुंबईचं पारडं जड) 'आम्हाला वेस्ट इंडिजचा मोठा दौरा करायचा आहे. त्यानंतर बांगलादेश दौरा, टी 20 वर्ल्ड कप आणि नंतर अ‍ॅशेस यामुळे पुढील 12 महिने अतिशय व्यस्त असतील.  या काळात मला स्वत:ला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या फिट राहयचं आहे. त्यामुळे मी आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे,' असे हेजलवूडने सांगितले. आयपीएलमधून माघार घेणारा हेजलवूड हा तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. यापूर्वी जोश फिलिपे आणि मिचेल मार्श यांनी आयपीएलमधून माघार घेतली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: