IPL 2021, MI vs RCB: विराट कोहलीचं डावपेच येणार RCB च्या अंगलट, मुंबईचं पारडं जड!

या आयपीएलमध्ये आरसीबीचा (RCB) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) एका नव्या योजनेसह उतरणार आहे. पण त्याची ही योजना पहिल्याच मॅचमध्ये अंगलट येऊ शकते.

या आयपीएलमध्ये आरसीबीचा (RCB) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) एका नव्या योजनेसह उतरणार आहे. पण त्याची ही योजना पहिल्याच मॅचमध्ये अंगलट येऊ शकते.

  • Share this:
    चेन्नई, 9 एप्रिल: विराट कोहलीची (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) ही टीम यंदा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशानं आयपीएलमध्ये (IPL 2021) उतरणार आहे. आरसीबीची पहिली मॅच बलाढ्य मुंबई इंडियन्सशी होणार आहे. या आयपीएलमध्ये आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली एका नव्या योजनेसह उतरणार आहे. पण त्याची ही योजना पहिल्याच मॅचमध्ये अंगलट येऊ शकते. या आयपीएलमध्ये ओपनिंगला येण्याची घोषणा विराटनं यापूर्वीच केली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील शेवटच्या टी20 मध्ये विराट कोहलीनं रोहित शर्मासह टीम इंडियाच्या इनिंगची सुरुवात केली होती. त्या मॅचमध्ये विराटनं 52 बॉलमध्ये 80 रन काढले होते. त्या मॅचनंतर स्वत: कोहलीनं या आयपीएलमध्ये ओपनिंग करणार असल्याचे संकेत दिले होते. विराटनं ओपनिंग बॅट्समन म्हणून 2016 च्या आयपीएलमध्ये चार शतकांसह 973 रन काढले होते. त्यानं आजवर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये आठ वेळा इनिंगची सुरुवात केली आहे. यामध्ये त्याच्या नावावर दोन अर्धशतकांचा समावेश आहे. विराटचा तिसऱ्या क्रमांकावरचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यामुळे हा नवा प्रयोग त्याच्या अंगाशी येणार का? हा प्रश्न उपस्थित झालाय. विराटचा मागील काही सिझनपासून स्पिन बॉलिंग विरुद्धचा रेकॉर्ड आश्चर्यकारकपणे घसरला आहे. 2015 ते 2017 या काळात विराटचा स्ट्राईक रेट 147.90 होता. जो 2018 साली 117.97 वर घसरला आहे. कोहली ओपनिंगला आला तर मुंबईकडून ट्रेंट बोल्ट आणि कृणाल पांड्या/राहुल चहर बॉलिंग सुरु करु शकतात. कोहलीला लेग स्पिनरनं हल्ली वारंवार त्रास दिला आहे. मुंबईच्या टीममध्ये पियूष चावला हा अनुभवी लेग स्पिनर आहे. तसंच जसप्रीत बुमराह देखील कोहलीला सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये रोखू शकतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आणखी एक काळजीची बातमी आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर विराटचा रेकॉर्ड चांगला नाही. या मैदानात विराटनं नेहमी संथ गतीनं रन केले आहेत. चेन्नईच्या पिचवर विराटचा स्ट्राईक रेट हा फक्त 111.49 आहे. ( IPL 2021, MI vs RCB: ही आहे दोन्ही टीमची संभाव्य Playing XI ) आयपीएलचा सर्वात यशस्वी बॅट्समन विराट कोहली आरसीबीकडं अगदी पहिल्या सिझनपासून आहे. त्यानं गेल्या 13 सिझनमधील 192 मॅचमध्ये 130.73 च्या स्ट्राईक रेटनं 5878 रन काढले आहेत. यामध्ये 5 शतकं आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे.
    Published by:News18 Desk
    First published: