मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : ब्रायन लाराला सतावयतेय मुंबई इंडियन्सची चिंता, म्हणाला...

IPL 2021 : ब्रायन लाराला सतावयतेय मुंबई इंडियन्सची चिंता, म्हणाला...

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) गतविजेत्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी फार समाधानकारक झाली नाही. मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या कामगिरीबाबत महान क्रिकेटपटू ब्रायन लाराने (Brian Lara) चिंता व्यक्त केली आहे.

  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 28 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) गतविजेत्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी फार समाधानकारक झाली नाही. आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांपैकी मुंबईने फक्त 2 सामने जिंकले तर 3 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या कामगिरीबाबत महान क्रिकेटपटू ब्रायन लाराने (Brian Lara) चिंता व्यक्त केली आहे. मुंबईच्या टीममध्ये विश्वासाची कमी जाणवत आहे, तसंच एकाच ठिकाणी भरपूर मॅचेस खेळायच्या असल्यामुळेही त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, असं लारा म्हणाला.

आयपीएलच्या सुरुवातीच्या 5 मॅच मुंबई इंडियन्सने चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियममध्ये खेळल्या, यानंतर पुढचे चार सामने दिल्लीमध्ये तर उरलेले सामने कोलकाता आणि बँगलोरमध्ये होणार आहेत. वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर जुळवून घेणं रोहितच्या टीमसाठी सोपं नसेल, असं लाराला वाटतं.

'बँगलोरची टीम (RCB) सध्या सगळे सामने जिंकत आहे, त्यामुळे ते हाच विश्वास घेऊन दुसऱ्या ठिकाणी खेळायला जातील, पण ज्या टीममध्ये विश्वासाचा अभाव असेल, त्यांच्यासाठी नवं ठिकाण त्रासदायक ठरू शकतं. इथल्या खेळपट्ट्या त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात,' असं लारा म्हणाला. स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह या शोमध्ये लारा बोलत होता.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबईच्या बॅट्समननी निराशा केली. 5 सामन्यांमध्ये त्यांना एकदाही 160 रनचा टप्पा गाठता आला नाही, तसंच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दोन खेळाडूंनाच अर्धशतकं करता आली आहेत. रोहित शर्माने पंजाबविरुद्ध तर सूर्यकुमार यादवने कोलकात्याविरुद्ध अर्धशतक केलं होतं. मुंबईच्या मधल्या फळीचा भक्कम आधार असणारे हार्दिक पांड्या (Hardik Pandya), कायरन पोलार्ड (Kieron Pollard), इशान किशन (Ishan Kishan) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांची कामगिरीही खराब झाली आहे. मुंबईचा पुढचा सामना गुरूवारी दुपारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्लीमध्ये होणार आहे.

मुंबई ही आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा पाचवेळा मुंबईने आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. मुख्य म्हणजे या पाचही वेळा रोहित शर्माच मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता.

First published:

Tags: Brain lara, IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma