मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 Auction: ग्लेन मॅक्सवेलला ‘या’ टीमकडून खेळण्याची इच्छा, सांगितलं खास कारण!

IPL 2021 Auction: ग्लेन मॅक्सवेलला ‘या’ टीमकडून खेळण्याची इच्छा, सांगितलं खास कारण!

ग्लेन मॅक्सवेलसाठी मागील आयपीएल सिझन (IPL 2020) निराशाजनक ठरला होता. या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबनं (KXIP) रिलीज केलं.

ग्लेन मॅक्सवेलसाठी मागील आयपीएल सिझन (IPL 2020) निराशाजनक ठरला होता. या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबनं (KXIP) रिलीज केलं.

ग्लेन मॅक्सवेलसाठी मागील आयपीएल सिझन (IPL 2020) निराशाजनक ठरला होता. या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबनं (KXIP) रिलीज केलं.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 फेब्रुवारी :  भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील टेस्ट सीरिज सुरू असतानाच सर्व क्रिकेट विश्वाला आता इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) वेध लागले आहे. या वर्षीच्या आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव गुरुवारी चेन्नईत होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) या लिलावाचं मुख्य आकर्षण असेल.

ग्लेन मॅक्सवेलसाठी मागील आयपीएल सिझन (IPL 2020) निराशाजनक ठरला होता. या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबनं (KXIP) रिलीज केलं. आयपीएल स्पर्धेनंतर मॅक्सवेल पुन्हा एकदा फॉर्मात आला आहे. भारताविरुद्ध झालेल्या मर्यादीत ओव्हर्सच्या सीरिजमध्ये मॅक्सवेलनं चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर बिग बॅश लीग या ऑस्ट्रेलियातील T20 स्पर्धेतही मॅक्सवेलची बॅट चालली. त्यामुळे आता पुन्हा एकदा या आयपीएल लिलावापूर्वी मॅक्सवेलला मोठा भाव आला आहे.

मॅक्सवेलला कोणती टीम हवी आहे?

‘ईएसपीएन क्रिकइन्फो’शी बोलताना मॅक्सवेलनं त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) खेळण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. आरसीबीचा एबी डिव्हीलियर्स  (AB de Villiers) हा मॅक्सवेलचा आदर्श आहे. “एबी माझ्यासाठी एक आदर्श आहे. त्याचा खेळ पाहयला नेहमी आवडतो. अशा प्रकारच्या खेळाडूसोबत खेळणं हा एक चांगला अनुभव असेल. त्याचा मला फायदा देखील होईल. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर मला नेहमीच छान वाटतं.’’ असं मॅक्सवेलनं सांगितलं.

( वाचा : IPL 2021 : आयपीएल लिलावाआधी ‘या’ टीमनं बदललं नाव! )

मॅक्सवेल आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सोबतही खेळण्यास उत्सुक आहे. “माझी विराटची नेहमी भेट होते. विराटच्या कॅप्टनसीमध्ये खेळणे हा चांगला अनुभव असेल. मला त्याच्यासोबत खेळताना मजा येईल, अशी प्रतिक्रिया मॅक्सवेलनं दिली आहे.

मॅक्सवेलला किती संधी?

आरसीबीनं यंदा ख्रिस मॉरीस, शिवम दुबे आणि मोईन अली या ऑल राऊंडर्सना रिलीज केलं आहे. त्यांच्या टीममधील ऑल राऊंडरची जागा मॅक्सवेल भरु शकतो. तो पहिल्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकावर कुठेही खेळण्यास सक्षम आहे. तसंच त्याची स्पिन बॉलिंग देखील टीमसाठी उपयुक्त आहे. आता मॅक्सवेलची ही इच्छा पूर्ण होणार का हे गुरुवारीच स्पष्ट होईल.

First published:

Tags: Cricket, Glenn maxwell, International, IPL 2021, Ipl 2021 auction, RCB, Sports, Virat kohli