नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : कोलकाता नाइटरायडर्सचा (Kolkata Knight Riders) संघ 14 गुण मिळवूनही आयपीएल बाहेर गेली आहे. याचे कारण म्हणजे त्यांचा रन रेट. KKRच्या कमी रन रेटमुळे हैदराबादचा संघ प्लेऑफ गाठणारा (IPL Playoff) चौथा संघ ठरला. कोलकाताबाबत पहिल्यांदाच असे घडले नाही आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्यांना नेट रन रेटमुळे आयपीएल बाहेर पडावे लागले. मुंबई (Mumbai Indians)चा पराभव करत हैदराबाद (SRH)ने प्ले-ऑफमध्ये धडक मारली आहे. हैदराबादच्या या विजयामुळे कोलकाता (KKR)चं प्ले-ऑफ गाठायचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम पहिल्या, दिल्लीची दुसऱ्या, हैदराबादची तिसऱ्या आणि बँगलोर चौथ्या क्रमांकावर आहे. या चारही टीम आता प्ले-ऑफमध्ये खेळणार आहेत. तिसऱ्यांदा कोलकाताला जवळ येऊन प्लेऑफ गाठता आलं नाही. KKRसोबत काय घडलं? कोलकाता नाइट रायडर्सनं (KKR) या हंगामात 7 सामने जिंकले. त्यामुळे त्यांच्याकडे 14 गुण होते. तर, रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांनीही 7 सामने जिंकले. मुंबई 18 आणि दिल्ली 16 गुणांसह याआधीच प्लेऑफमध्ये पोहचली होती. त्यामुळे हैदराबादचा पराभव कोलकातासाठी फायद्याचा होता. मात्र हैदराबादनं हा सामना जिंकला. हैदराबाद (0.608) आणि बॅंगलोर (-0.172) यांनी रन रेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये जागा मिळवली. तर, कोलकाता (-0.214) रन रेटसह बाहेर झाली. वाचा- IPL 2020 : आयपीएल प्ले-ऑफच्या चारही टीम ठरल्या, पाहा कधी होणार मॅच दिल्लीचा संघ 9 चेंडू आधी जिंकली असती सामना तर… कोलकातानं राजस्थानला हरवत 14 गुण मिळवले. मात्र दिल्ली आणि बॅंगलोर यांच्यातील सामना कोलकातासाठी महत्त्वाचा होता. या सामन्याआधी दोन्ही संघांकडे 14 गुण होते. या सामन्यात दिल्लीनं बॅंगलोरला 19व्या ओव्हरमध्ये हरवले. जर दिल्लीचा संघ हा सामना 17.3 ओव्हरमध्ये जिंकला असता तर बॅंगलोर ऐवजी कोलकाताच संघ प्लेऑफमध्ये पोहचला असता. मात्र त्या 9 चेंडूंनी कोलकाताचं नशीब पलटवलं. वाचा- IPL 2020 : मुंबईला हरवून हैदराबाद प्ले-ऑफमध्ये, कोलकात्याचं स्वप्न पुन्हा भंगलं गेल्यावर्षीही रनरेटनं केला होता घात मागच्यावर्षीही नेट रनरेटनेच कोलकात्याचा घात केला होता. 2019 साली 56 मॅचनंतर मुंबई आणि चेन्नईचे 18 पॉइंट्स होते. तसंच हैदराबादने मागच्यावेळी 12 पॉइंट्ससह प्ले-ऑफ गाठली होती. मुख्य म्हणजे हैदराबादप्रमाणेच कोलकात्याचेही 12 पॉइंट्स होते, पण हैदराबादचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे कोलकात्याला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नव्हता. यावेली कोलकात्याचा नेट रनरेट - 0.214 आहे, तर हैदराबादचा नेट रनरेट 0.555 इतका आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.