जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020 : मुंबईला हरवून हैदराबाद प्ले-ऑफमध्ये, कोलकात्याचं स्वप्न पुन्हा भंगलं

IPL 2020 : मुंबईला हरवून हैदराबाद प्ले-ऑफमध्ये, कोलकात्याचं स्वप्न पुन्हा भंगलं

IPL 2020 : मुंबईला हरवून हैदराबाद प्ले-ऑफमध्ये, कोलकात्याचं स्वप्न पुन्हा भंगलं

मुंबई (Mumbai Indians)चा पराभव करत हैदराबाद (SRH)ने प्ले-ऑफमध्ये धडक मारली आहे. हैदराबादच्या या विजयामुळे कोलकाता (KKR)चं प्ले-ऑफ गाठायचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

शारजाह, 3 नोव्हेंबर : मुंबई (Mumbai Indians)चा पराभव करत हैदराबाद (SRH)ने प्ले-ऑफमध्ये धडक मारली आहे. हैदराबादच्या या विजयामुळे कोलकाता (KKR)चं प्ले-ऑफ गाठायचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. मुंबईने ठेवलेल्या 150 रनच्या आव्हानाचा पाठलाग हैदराबादने एकही विकेट न गमावता 17.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. डेव्हिड वॉर्नरने 58 बॉलमध्ये नाबाद 85 रन आणि ऋद्धीमान सहाने 45 बॉलमध्ये नाबाद 58 रन केले. या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता, यानंतर हैदराबादच्या बॉलरनी सुरुवातीपासूनच मुंबईला धक्के द्यायला सुरुवात केली. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला, तर क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. डिकॉकने 25, सूर्यकुमारने 36 आणि इशान किशनने 33 रन केले. कायरन पोलार्डने 25 बॉलमध्ये 41 रनची आक्रमक खेळी केली. हैदराबादकडून संदीप शर्माने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जेसन होल्डर, नदीमला प्रत्येकी 2 आणि राशिद खानला 1 विकेट मिळाली. या मॅचमध्ये हैदराबादचा पराभव झाला असता तर कोलकात्याला प्ले-ऑफमध्ये पोहोचता आलं असतं, पण हैदराबादने ही त्यांना ही संधी दिली नाही. आयपीएलच्या ग्रुप स्टेजमधली ही शेवटची मॅच होती. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम पहिल्या, दिल्लीची दुसऱ्या, हैदराबादची तिसऱ्या आणि बँगलोर चौथ्या क्रमांकावर आहे. या चारही टीम आता प्ले-ऑफमध्ये खेळणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात