स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 CSK vs DC LIVE : चेन्नईनं गमावला सलग दुसरा सामना, दिल्लीचा 44 धावांनी विजय

IPL 2020 CSK vs DC LIVE : चेन्नईनं गमावला सलग दुसरा सामना, दिल्लीचा 44 धावांनी विजय

दुसरीकडे दिल्लीने जबरदस्त गोलंदाजी केली. दिल्लीकडून रबाडानं अखेरच्या ओव्हरमध्ये 4 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर एनरिच 2 विकेट तर अक्सर पटेलनं एक विकेट घेतली.

  • Share this:

दुबई, 25 सप्टेंबर : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Delhi Capitals vs Chennai Super Kings) यांच्यात झालेल्या सामना दिल्लीनं 44धावांनी जिंकला. दिल्लीने दिलेल्या 176 धावांचे आव्हान चेन्नईला पार करता आले नाही. या सामन्यातही फाफ वगळता इतर एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. परिणामी 20 ओव्हरमध्ये चेन्नईने 131 धावा केल्या. दुसरीकडे दिल्लीने जबरदस्त गोलंदाजी केली. दिल्लीकडून रबाडानं अखेरच्या ओव्हरमध्ये 4 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर एनरिच 2 विकेट तर अक्सर पटेलनं एक विकेट घेतली.

दिल्लीनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली नाही. शेन वॉट्सन 14 धावा करत बाद झाला. तर, विजय 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर फाफ वगळता इतर फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. फाफने 35 चेंडूत 43 धावा केल्या. फाफशिवाय केदार जाधव मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. तर, सहाव्या क्रमांकावर आलेल्या धोनीलाही विशेष चांगली फलंदाजी करता आली नाही. धोनी अखेरच्या ओव्हरमध्ये 15 धावा करत बाद झाला.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दणक्यात सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची खेळी केली. मात्र पियूष चावलानं दिल्लीला पहिला झटका दिला. शिखर धवन 35 धावांवर बाद झाला. त्यानंतर लगेचच पृथ्वी शॉही माघारी गेला. 43 चेंडूत 64 धावा करत पृथ्वी शॉही बाद झाला. मोठा शॉट खेळण्याच्या नादात पृथ्वी शॉ पुढे आला, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. धोनीनं कोणतीही चूक न करता पृथ्वीला स्टम्प आऊट केले. पृथ्वी-शिखर बाद झाल्यानंतर दिल्लीचा डाव गडगडला. श्रेयस अय्यरही 26 धावा करत बाद झाला. धोनीनं जबरदस्त कॅच घेत अय्यरला बाद केले. ऋषभ पंतने शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी केली. पंतने 6 चौकार 37 धावा केल्या. चेन्नईकडून पियूष चावलानं 2 तर सॅम करननं एक विकेट घेतली.

चेन्नईचा संघ- मुरली विजय, शेन वॉट्सन, फाफ ड्यू प्लेसिस, सॅम करन, ऋतुराज गायकवाद, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, जोश हेजलवूड, दीपक चाहर, पियूष चावला.

दिल्लीचा संघ-पृथ्वी शॉ, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मार्कस स्टाॉइनस, अक्सर पटेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, अनरिच नॉर्ते, अवेश खान

Published by: Priyanka Gawde
First published: September 25, 2020, 7:05 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading