MI vs CSK : फायनलमध्ये 'तू-तू, मैं-मैं', धोनीनं केला मोठा खुलासा

MI vs CSK : फायनलमध्ये 'तू-तू, मैं-मैं', धोनीनं केला मोठा खुलासा

अगदी शेवटच्या चेंडूवर मुंबईनं चेन्नईवर विजय मिळवला खरा पण धोनीचं याबाबत काही तरी वेगळचं मत आहे.

  • Share this:

हैदराबाद, 13 मे : चेन्नईला पराभूत करून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12 व्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. मुंबईचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने टाकलेल्या शेवटच्या षटकात मुंबईने एका धावेनं विजय साजरा केला. मात्र मुंबईसाठी टर्निंग पॉईंट ठरला तो, धोनीची विकेट. जर मैदानावर खेळत असता तर या अंतिम सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागला असता. पण धोनीचं मत मात्र याबाबत वेगळ आहे. सामना झाल्यानंतर धोनीनं चेन्नईच्या पराभवाबाबत मोठा खुलासा केला.

मुंबईने दिलेलं 150 धावांचं आव्हान चेन्नई सहज पूर्ण करेल असं वाटत होतं. कारण चेन्नईकडून शेन वॉटसन तुफान फलंदाजी करत होता. त्याच्या 80 खेळीच्या जोरावर चेन्नई बाजी मारेल अशी परिस्थिती होती. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये मुंबईनं सामन्यावर पकड मिळवली. धोनी बाद झाल्यानंतर शेन वॉटसन बाद झाला. आणि सामना चेन्नईच्या बाजूनं झुकला. दरम्यान, शेवटच्या षटकात लसिथ मलिंगाने टिच्चून गोलंदाजी केली. याच षटकात शेन वॉटसन धावबाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकुरला बाद करत मलिंगाने मुंबईला विजय मिळवून दिला. मात्र धोनीच्या मते, दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांकडे ट्रॉफी पास करत होते, दोन्ही संघांनी चुका केल्या. पण कदाचित मुंबईनं आमच्यापेक्षा एक चुक कमी केली. त्यामुळं ते सामना जिंकले. या लढतीत मुंबई इंडियन्सने तीन झेल सोडले. तर चेन्नईचे सलग दोन फलंदाज धावबाद झाले.

धोनीच्या मते, हा सामना असा होता की यात अधिक चांगली कामगिरी होऊ शकली असती. पण धोनीसाठी चितेंचा विषय होती ती, मधली फळी. त्यानेच धोनीला दगा दिला. दरम्यान धोनीनं अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्याच श्रेय आपल्या गोलंदाजांना दिलं. संजय मांजरेकर यांनी धोनीला निवृत्ती संदर्भात विचारले असता, ''सध्या माझे प्राधान्य विश्वचषक आहे. आयपीएल आणि चेन्नई यांच्याबाबत मी नंतर बोलेन. आमची गोलंदाजी चांगली आहे. मात्र फलंदाजीवर लक्ष्य केंद्रित करावे लागेल.'' असंही धोनी म्हणाला.

धोनीच्या या तीन चुका पडल्या महागात

आयपीएलच्या 12 व्या हंगामात शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सने चेन्नईला पराभूत करून चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहरच्या गोलंदाजीनंतर लसिथ मलिंगाने टाकलेल्या निर्णायक षटकाने सामना रोमहर्षक झाला. चेन्नईच्या फलंदाजांना जीवदान मिळालं मात्र, त्याचा फायदा त्यांना घेतला आला नाही. तसेच सामन्यात केलेल्या तीन चुका त्यांना महागात पडल्या. यामुळे अवघ्या एका धावेनं विजेतेपदानं त्यांना हुलकावणी दिली.

पहिली चूक : वॉटसन नको म्हणत असताना रैनाने डीआरएसचा निर्णय घेतला. चाहरने टाकलेल्या 10 व्या षटकात रैनाला पायचित केलं होतं. तेव्हा वॉटसनने रैना बाद असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे डीआरएसची एक संधी चेन्नईने गमावली.

दुसरी चूक : मुंबईकडून सर्वात कमी धावा दिल्या त्या हार्दिक पांड्याने. त्याने एका षटकात फक्त तीन धावा दिल्या. एवढंच नाही तर या षटकात धोनी धावबाद झाला. ओव्हर थ्रोवर धाव घेण्याची धोनीची चूक चेन्नईला महागात पडली.

तीसरी चूक : सामन्याच्या शेवटच्या षटकात 9 धावा पाहिजे होत्या. तेव्हा क्रीजवर असलेल्या वॉटसन आणि जडेजासाठी या धावा जास्त नव्हत्या. मात्र, दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या नादात वॉटसन बाद झाला. तिथंच सामन्यात मुंबईने कमबॅक केलं.

वाचा- VIDEO : फायनल जिंकल्यानतंर बायकोच्या प्रश्नांना रोहितने दिलं उत्तर

वाचा- मुंबईला विजय मिळवून देणारे खेळाडू World Cup च्या मात्र संघातून बाहेर

वाचा- 'थ्री मिस्टेक्स इन फायनल', धोनी स्वत:ला माफ नाही करणार

SPECIAL REPORT: वृद्ध आई-वडिलांमुळे लग्न जमेना, तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

First published: May 13, 2019, 1:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading