हैदराबाद, 13 मे : चेन्नईला पराभूत करून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12 व्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. मुंबईचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने टाकलेल्या शेवटच्या षटकात मुंबईने एका धावेनं विजय साजरा केला.
मुंबईने दिलेलं 150 धावांचं आव्हान चेन्नई सहज पूर्ण करेल असं वाटत होतं. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये मुंबईने सामन्यावर पकड मिळवली. धोनी बाद झाल्यानंतर चेन्नईचे दोन फलंदाज लागोपाठ बाद झाले. शेवटच्या षटकात लसिथ मलिंगाने टिच्चून गोलंदाजी केली. याच षटकात शेन वॉटसन धावबाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकुरला बाद करत मलिंगाने मुंबईला विजय मिळवून दिला.
चौथ्यांदा आयपीएलचं विजेतेपद मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या बायकोने त्याची मुलाखत घेतली. यावेळी तिने काही प्रश्न विचारले. मुलगी समायराच्या उपस्थितीत आयपीएलचं विजेतेपद पटकावल्यानंतर कसं वाटत आहे या प्रश्नावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, फक्त समायराच नाही तर तुसुद्धा या मैदानावर उपस्थित होतीस याचा मला आनंद झाला. यानंतर रितिकाने रोहितला विचारलं की, सामना इतका रंगतदार होता की शेवटी मी डोळे झाकले. मला पाहता आलं नाही तु कसा खेळलास ? यावर रोहित म्हणाला की, मला खेळायचं होतं त्यामुळं डोळे बंद करू शकत नव्हतं. शेवटच्या षटके कशी असतात हे आम्हाला माहिती आहे. गेल्यावेळी मिशेल जॉन्सन होता तर आता मलिंगाने करून दाखवलं. शेवटी रितिका आणि रोहित यांनी एकमेकांचे अभिनंदन केलं.
दरम्यान, टॉस जिंकत मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पोलार्डच्या खेळीच्या जोरावर मुंबईनं 150 धावा केल्या. वॉटसनची खेळी व्यर्थ गेली. त्याने 59 चेंडूत 80 धावांची खेळी केली. यात त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले. शेवटच्याच षटकात तो मलिंगाच्या गोलंदाजीवर धावबाद झाला. दरम्यान मुंबईनं दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना ड्यु प्लेसिस बाद झाल्यानंतर सुरेश रैना आणि अंबाती रायडू पाठोपाठ बाद झाले झाला. रैनाला राहुल चहरनं तर, रायडूला बुमराहनं बाद केले. रैना 8 धावांवर तर, रायडू केवळ एक धाव करत बाद झाला.
मुंबईतील ATMमध्ये तरुणीसमोर युवकाचं हस्तमैथुन, मुलीनेच शूट केला VIDEO