• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • पाकिस्तानी खेळाडूही झाला पंतचा फॅन, केली मोठी भविष्यवाणी

पाकिस्तानी खेळाडूही झाला पंतचा फॅन, केली मोठी भविष्यवाणी

पाकिस्तान टीमचा माजी कर्णधार इंजमाम उल हकही (Inzamam Ul Haq) भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतचा (Rishabh Pant) फॅन झाला आहे. ऋषभ पंतने हाच फॉर्म कायम ठेवला तर तो एमएस धोनी (MS Dhoni) आणि एडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) यांच्याही पुढे जाईल, असं इंजमाम म्हणाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 मार्च : पाकिस्तान टीमचा माजी कर्णधार इंजमाम उल हकही (Inzamam Ul Haq) भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतचा (Rishabh Pant) फॅन झाला आहे. इंजमामने ऋषभ पंतबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. ऋषभ पंतने हाच फॉर्म कायम ठेवला तर तो एमएस धोनी (MS Dhoni) आणि एडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) यांच्याही पुढे जाईल, असं इंजमाम म्हणाला आहे. इंजमामने त्याच्या युट्यूब चॅनलवर पंतचं कौतुक केलं. 'ऋषभ पंत ज्या पद्धतीने खेळतो, जसे शॉट मारतो. मागच्या 30-35 वर्षात फक्त धोनी आणि एडम गिलख्रिस्ट यांनीच अशी कामगिरी केली आहे. हे दोन विकेट कीपर स्वत:च्या जीवावर मॅच जिंकवून द्यायचे. ऋषभ पंतही तशीच कामगिरी करत आहे. जर तो अशाच पद्धतीने खेळला तर लवकरच तो धोनी आणि गिलख्रिस्टला मागे टाकेल,' अशी प्रतिक्रिया इंजमामने दिली. 'मागच्या 6-7 महिन्यात पंतचा खेळ मी बघत आहे. त्याने खूप सुधारणा केली आहे. वेगवेगळ्या क्रमांकावर बॅटिंग करणं शानदार आहे. दुसऱ्या वनडेमध्ये (India vs England) पंत आणि राहुल (KL Rahul) यांच्यात शतकी पार्टनरशीप झाली. राहुलनेही शतक केलं, पण मॅचचं रूप पंत आणि पांड्या (Hardik Pandya) यांनी बदललं. या दोघांनीही आक्रमक बॅटिंग केली. त्यामुळेच भारताने मधल्या ओव्हरमध्ये संथ बॅटिंग करूनही 336 रनपर्यंत पोहोचता आलं,' असं वक्तव्य इंजमामने केलं. दुसऱ्या वनडेमध्ये पंतने 40 बॉलमध्ये 77 रनची तर हार्दिक पांड्याने 16 बॉलमध्ये 35 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India vs Australia) टीम इंडियामध्ये पुनरागमन केल्यानंतर पंत जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मागच्या 6 टेस्टमध्ये पंतने 4 अर्धशतकं आणि एक शतक केलं आहे. तर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेमध्येही त्याने आक्रमक खेळी केली. पंतने 20 टेस्टमध्ये 45 पेक्षा जास्तच्या सरासरीने 1,358 रन केले आहेत, यात तीन शतकांचा समावेश आहे. तर वनडेमध्ये त्याच्या नावावर 17 मॅच खेळून 451 रन आहेत.
  Published by:Shreyas
  First published: