जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: टीम इंडियाचा कॅप्टन कोहलीची ‘विराट’ कामगिरी, धोनीचा मोठा विक्रम मोडला

IND vs ENG: टीम इंडियाचा कॅप्टन कोहलीची ‘विराट’ कामगिरी, धोनीचा मोठा विक्रम मोडला

IND vs ENG: टीम इंडियाचा कॅप्टन कोहलीची ‘विराट’ कामगिरी, धोनीचा मोठा विक्रम मोडला

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी टेस्ट टीम इंडियानं 10 विकेट्सनं दणदणीत जिंकली आहे. या विजयासह टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यानं आणखी एक मोठा विक्रम केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद, 26 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी टेस्ट टीम इंडियानं 10 विकेट्सनं दणदणीत जिंकली आहे. या विजयासह भारतानं चार टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. भारतीय स्पिनर्स या विजयाचे शिल्पकार होते. इंग्लंडच्या 20 पैकी 19 विकेट्स या स्पिनर्सनी घेतल्या. भारताच्या तीन स्पिनर्सपैकी अक्षर पटेल (Axar Patel) हा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं एकट्यानंच 11 विकेट्स घेतल्या आहेत. या विजयासह टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यानं आणखी एक मोठा विक्रम केला आहे. विराट कोहली आता घरच्या मैदानावर सर्वात जास्त टेस्ट मॅच जिंकणारा भारतीय कॅप्टन बनला आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये भारतानं 29 पैकी 22 टेस्टमध्ये विजय मिळवला आहे. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये भारतानं मायदेशात 30 पैकी 21 टेस्ट मॅच जिंकल्या होत्या. तीन गमावल्या तर सहा ड्रॉ झाल्या. धोनीच्या यशाची टक्केवारी ही 70 टक्के आहे. तर विराटच्या कॅप्टनसीमध्ये भारताची सरासरी 76 टक्के आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये भारतानं होम ग्राऊंडवर एकूण 29 टेस्ट खेळल्या असून यामध्ये फक्त दोन टेस्ट गमावल्या आहेत. तर पाच टेस्ट ड्रॉ केल्या आहेत. भारताच्या यशस्वी कॅप्टनच्या यादीत धोनी आणि कोहली नंतर मोहम्मद अझहरुद्दीन (13) सौरव गांगुली (10) आणि सुनील गावसकर (7) टेस्ट विजय अशी क्रमवारी आहे. ( वाचा :  IND vs ENG: अहमदाबाद पिचबाबत रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला… ) भारतानं अहमदाबादमधील टेस्ट जिंकताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलची दावेदारी बळकट केली आहे. आता भारताला या स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी चौथी टेस्ट ड्रॉ केली तरी चालणार आहे. भारत चौथ्या टेस्टमध्ये पराभूत झाल्यास ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पोहचेल. इंग्लंडचं मात्र या स्पर्धेतील आव्हान आता संपुष्टात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात