जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अख्खं नागपूर बोलतंय, शुभमन आतातरी बघं! पोस्टर गर्लवरून उमेश यादवच ट्विट

अख्खं नागपूर बोलतंय, शुभमन आतातरी बघं! पोस्टर गर्लवरून उमेश यादवच ट्विट

अख्खं नागपूर बोलतंय, शुभमन आतातरी बघं! पोस्टर गर्लवरून उमेश यादवच ट्विट

नागपूरच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार आहे. असे असतानाच सामन्यापूर्वी नागपूर शहरात लागलेले पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 4 जानेवारी : भारताचा स्टार युवा क्रिकेटपटू शुभमन गिलची सध्या सर्वत्रच चर्चा आहे. 23 वर्षीय क्रिकेटर सध्या जबरदस्त फॉर्मात असून त्याने भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टी 20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 6 वे शतक पूर्ण केले. शुभमनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक चर्चा रंगताना दिसतात. त्याचे नाव सारा तेंडुलकर आणि सारा अली खान या दोघींशी जोडले जाते. परंतु या दोन सारांपैकी शुभमन कोणत्या साराला डेट करतोय याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. असे असताना आता अजून एक तरुणी शुभमनच्या मागे लागली आहे. तिने तर थेट टिंडर अँपलाच शुभमन आणि तीच नातं जुळवण्याची विनंती केली. तरुणींकडून शुभमनला मिळणाऱ्या या अटेंशनवरून आता भारतीय क्रिकेटपटू उमेश यादव याने ट्विट करत त्याला ट्रोल केलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार आहे. याकरता भारतीय संघ नागपूरमध्ये दाखल झाला आहे. असे असतानाच सामन्यापूर्वी नागपूर शहरात लागलेले पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर भारत-न्यूझीलँड मॅच दरम्यान पोस्टर हातात घेऊन टिंडरला “शुभमनसे मॅच करा दो” अशी विनंती करणाऱ्या मुलीचा फोटो आहे. याला टिंडरने आपल्या जाहिरातीसाठी वापरून त्याच्यावर शुभमन इधर तो देख लो असे लिहिले आहे.

जाहिरात

भारताचा क्रिकेटर उमेश यादव याने नागपूर शहरात लागलेले हे पोस्टर ट्विट करून शुभमनला मजेदार पद्धतीने ट्रोल केले. त्याने ट्विट करत लिहिले, “पुरा नागपूर बोल रहाहे, शुभमन अब तो देख ले”.  अद्याप शुभमनने उमेशच्या या ट्विटला रिप्लाय दिला नसला तरी उमेशचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात