मुंबई, 3 फेब्रुवारी : भारताचा वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मा यांनी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारी त्यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
Announced retirement from cricket Thanks to each and everyone for your love and support 🙏❤️👍👍 pic.twitter.com/A2G9JJd515
— Joginder Sharma 🇮🇳 (@MJoginderSharma) February 3, 2023
2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला जिंकून देण्यासाठी जोगिंदर शर्मा याने मोलाची भूमिका बजावली होती. जोगिंदरने भारतासाठी चार T20 आणि वनडे सामने खेळले. आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज या संघाकडून त्याने चांगली खेळी केली.
हे ही वाचा : सिंघम आणि सिंबालाही टाकलं मागे! MS Dhoni चा पोलीस वेशातील Photo Viral
39 वर्षीय जोगिंदर शर्मा हे सध्या हरियाणा पोलिसांमध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), हरियाणा क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज आणि हरियाणा सरकारचे आभार मानले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Team india