मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

बुमराहच्या बॉलिंगवर ही सुंदर अभिनेत्री क्लीन बोल्ड? अनुपमाही सुट्टीवर गेल्याने लग्नाच्या चर्चांना उधाण

बुमराहच्या बॉलिंगवर ही सुंदर अभिनेत्री क्लीन बोल्ड? अनुपमाही सुट्टीवर गेल्याने लग्नाच्या चर्चांना उधाण

Jasprit Bumrah Marriage: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याआधी (IND vs ENG) बुमराहने अचानक BCCI कडे सुट्टी मागितली आहे. वैयक्तिक कारणांसाठी बुमराहने सुट्टी घेतल्याचं समजलं असलं तरी तो लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 3 मार्च : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा त्याच्या दमदार कामगिरीसाठी नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या बुमराह (Jasprit bumrah wedding) एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याआधी (IND vs ENG) बुमराहने अचानक BCCI कडे सुट्टी मागितली आहे. वैयक्तिक कारणांसाठी बुमराहने माघार घेतली असली तरी आता त्याच्या लग्नाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. त्याची अर्धांगिनी नेमकी कोण होणार? (Bumrah girlfriend) याबाबत क्रिकेट विश्वात अनेक वावड्या उठवल्या जात आहेत.

नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार, दक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अनुपमा परमेश्वरण (Anupama Parmeswaran On leave) हिनेही आपल्या चित्रीकरणातून सुट्टी घेतली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आणि अनुपमा दोघं विवाहबंधनात (bumrah Anupama Parmeswaran Marriage) अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वी दोघेजण एकत्र दिसले आहेत. तसेच ते दोघं एकमेकाला डेट करत असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. त्यामुळे एकिकडे जसप्रीत बुमराहने क्रिकेटमधून अचानक सुट्टी घेतली, तर दुसरीकडे अनुपमानेही सुट्टी घेणं. या दोन्ही घटनांना एकत्रित जोडल्याने दोघांच्या लग्नाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पण या दोघांपैकी कोणीही विवाहाची अधिकृत माहिती दिलेली नाही.

याशिवाय, जसप्रीत बुमराह लवकरच विवाहबंधनात (Jasprit Bumrah Marriage) अडकणार आहे. त्यामुळे त्याने लग्नाच्या तयारीसाठीच कसोटी मालिकेतून माघार घेतल्याची माहिती BCCIमधील सूत्रांकडून देण्यात आली आहे. 'मी लग्न करत असल्याने लग्नाच्या तयारीसाठी मला सुट्टी हवी आहे,' असं जसप्रीत बुमराहने बीसीसीआयला सांगितल्याचंही कळतं आहे. त्यामुळे आपल्या घातक यॉर्कर्सने जगभरातील दिग्गज फलंदाजांची विकेट घेणाऱ्या बुमराहची विकेट नेमकी कोणी घेतली, याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. बॉलिवूड सेलेब्रेटींप्रमाणेच क्रिकेटर्सचा विवाहसोहळा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. बुमराहच्या बाबतीतही हेच घडत आहे.

हे ही वाचा -जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या बातमीवर युवराजची मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाला...

दरम्यान, चार टेस्टच्या या मालिकेत भारतीय टीम सध्या 2-1 नं आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची (WTC) फायनल गाठण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं किंवा ड्रॉ करणं आवश्यक आहे. तसं झालं तर लॉर्ड्सवर होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारतानं ही टेस्ट गमावल्यास ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल. तिसऱ्या टेस्टमध्ये पराभूत झाल्यानं इंग्लंडचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

First published:

Tags: IND Vs ENG, Jasprit bumrah, Marriage, South actress