मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या बातमीवर युवराजची मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाला...

जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या बातमीवर युवराजची मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाला...

टीम इंडियाचा प्रमुख फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच लग्न करणार आहे, अशी बातमी आहे.टीम इंडियाचा माजी ऑल राउंडर युवराज सिंहनं (Yuvraj Singh)  या विषयावर एक मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडियाचा प्रमुख फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच लग्न करणार आहे, अशी बातमी आहे.टीम इंडियाचा माजी ऑल राउंडर युवराज सिंहनं (Yuvraj Singh) या विषयावर एक मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडियाचा प्रमुख फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच लग्न करणार आहे, अशी बातमी आहे.टीम इंडियाचा माजी ऑल राउंडर युवराज सिंहनं (Yuvraj Singh) या विषयावर एक मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 3 मार्च : टीम इंडियाचा (Team India) प्रमुख फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच लग्न करणार आहे, अशी बातमी आहे. बुमराहच्या लग्नाची ‘गुड न्यूज’ उघड होताच त्याचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. टीम इंडियाचा माजी ऑल राउंडर युवराज सिंहनं (Yuvraj Singh) या विषयावर एक मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

बुमराहनं इंग्लंड विरुद्ध होणारी चौथी टेस्ट आणि त्यानंतरची वन-डे आणि T20 सीरिजमधून माघार घेतली आहे. आपण वैयक्तिक कारणामुळे माघार घेत असल्याचं बुमराहनं शनिवारी स्पष्ट केले होते. त्यानं ट्विटरवर स्वत:चा एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये तो गंभीर दिसत आहे. युवराजनं त्या फोटोवर उत्तर देताना मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

युवराजनं काही दिवसांपूर्वी शुभमन गिलच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली होती. क्रिकेटपटूंच्या पोस्टवर नेहमीच मजेशीर प्रतिक्रिया देणाऱ्या युवराजनं यावेळी बुमराहला ‘फडकं मारु की झाडू’ असा प्रश्न विचारला आहे.

Paucha marun pehle yah jhadu ?

— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) March 2, 2021

'मी लग्न करत असल्याने त्या तयारीसाठी मला सुट्टी हवी आहे,' असं जसप्रीत बुमराहने बीसीसीआयला सांगितल्याचं कळतंय. त्यामुळे आपल्या घातक यॉर्कर्सने जगभरातील दिग्गज फलंदाजांची विकेट घेणाऱ्या बुमराहची विकेट नेमकी कोणी घेतली, याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

(हे वाचा : IPL 2021 : धोनी या दिवशी मैदानात उतरणार, सराव सुरू करणार!)

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट गुरुवारपासून अहमदाबादमध्ये सुरु होत आहे.  या मॅचमध्ये उमेश यादवला (Umesh Yadav) संधी दिली जाऊ शकते. उमेश यादव फिटनेस टेस्टमध्येही पास झाला आहे. त्याने शेवटची टेस्ट ऑस्ट्रेलियामध्ये डिसेंबर महिन्यात खेळली. दुखापतीमुळे तो सीरिज अर्धवट सोडून भारतात परतला होता. भारतात फास्ट बॉलरची कामगिरी बघितली तर उमेशची सरासरी आणि स्ट्राईक रेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात टेस्ट मॅचमध्ये 10 विकेट घेणारा तो फक्त तिसरा फास्ट बॉलर आहे.

उमेश यादव घरच्या मैदानात 100 विकेट घेण्यापासून फक्त 4 पावलं लांब आहे. आतापर्यंत फक्त 4 फास्ट बॉलरनाच भारतात 100 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट मिळाल्या आहेत.

First published:

Tags: Cricket news, Entertainment, Jasprit bumrah, Marriage, Social media, Yuvraj singh