मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

अपमान झाल्यासारखं वाटलं; शूज काढून उभा केल्यानं ग्रँडमास्टर नारायणन भडकला

अपमान झाल्यासारखं वाटलं; शूज काढून उभा केल्यानं ग्रँडमास्टर नारायणन भडकला

ग्रँडमास्टर नारायणन याने ट्विट करत म्हटलं की, 'मला अपमान झाल्यासारखं वाटतंय. मी जर शांत राहिलो तर स्वत:सह इतर खेळाडूंना न्याय मिळणार नाही ज्यांना असाच अनुभव आला.'

ग्रँडमास्टर नारायणन याने ट्विट करत म्हटलं की, 'मला अपमान झाल्यासारखं वाटतंय. मी जर शांत राहिलो तर स्वत:सह इतर खेळाडूंना न्याय मिळणार नाही ज्यांना असाच अनुभव आला.'

ग्रँडमास्टर नारायणन याने ट्विट करत म्हटलं की, 'मला अपमान झाल्यासारखं वाटतंय. मी जर शांत राहिलो तर स्वत:सह इतर खेळाडूंना न्याय मिळणार नाही ज्यांना असाच अनुभव आला.'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

भारताचा ग्रँडमास्टर एस एल नारायणन हा जर्मनीत सोमवारी बुंडेस्लिगा चेस लीगमध्ये सहभागी जाला होता. यावेळी आपल्याला जी वागणूक मिळाली त्यामुळे अपमानास्पद वाटत असल्याचं त्याने म्हटलं आहे. सोशल मीडियावरून नारायणन याने ट्विट करत म्हटलं की, 'मला अपमान झाल्यासारखं वाटतंय. मी जर शांत राहिलो तर स्वत:सह इतर खेळाडूंना न्याय मिळणार नाही ज्यांना असाच अनुभव आला.' बुंडेस्लिगा चेस लीगवेळी मेटल डिटेक्टर तपासणीवेळी जिथे बुद्धीबळ स्पर्धा सुरू होती तेव्हा पायातले शूज काढून उभा राहयला लावलं. तपासणीवेळी बीपचा आवाज आल्यान नारायणनला शूज आणि पायमोजे काढायला लागले.

नारायणनला या प्रकारामुळे धक्का बसला आणि पहिला सामना टीम एसव्ही डेगेनडॉर्फकडून पराभूत झाला. त्याला झेक प्रजासत्ताकच्या नंबर 1 चा ग्रँडमास्टर डेव्हिड नवाराने हरवलं होतं. टीम एसव्ही डेगेनडॉर्फकसाठी हंगामातील हा पहिला पराभव होता. अखेर ग्रँडमास्टर नारायणनने ट्विटरवरून आपल्यावर ओढावलेला प्रसंग सांगितला.

हेही वाचा: Team India: BCCI चा नवा प्लॅन! टीम इंडियाच्या 3 सिनियर प्लेयर्सची होणार टी20तून कायमची सुट्टी?

नारायणनने म्हटलं की, आज मला माझा अपमान झाल्यासारखं वाटलं. मी बुंडेस्लिगामध्ये खेळलो. पहिल्या टप्प्यात ऑर्बिटरने रँडम तपासणीसाठी ज्यांची निवड केली होती त्या पाचमध्ये मी होतो. मेटल डिटेक्टरने तपासणीवेळी बीप असा आवाज आला तेव्हा मला माझे शूज काढायला लावले. पुन्हा तपासणी केली तरी आवाज आला. त्यानंतर मला पायमोजे काढायला लावले. तेव्हा माझ्या अनवाणी पायांवर मेटल डिटेक्टर फिरवला तरी बीप असा आवाज आला.

बीप आवाज आल्यानंतर मला एका बाजूला जाण्यास सांगण्यात आले. त्यानतंर दुसऱ्या खेळाडुला पुढे येण्यास सांगण्यात आले. ज्या गोष्टीबद्दल मला काहीच माहिती नाही त्याबद्दल मला दोषी ठरवलं यामुळे किती वाईट वाटलं हे समजणं कठीण आहे असंही नारायणनने म्हटलं.

हेही वाचा : IND vs NZ: अखेरच्या सामन्यात सूर्यकुमारला विश्वविक्रमाची संधी, रोहितला टाकणार मागे?

स्पर्धेच्या ठीकाणी हॉलच्या मधोमध हे सगळं घडलं. मी एक पायमोजा हातात घेतला आणि एका पायात काही न घालता उभा राहिलो. कल्पना करा की मला कसं वाटलं असेल. ही तपासणी लगेच संपली कारण सुरक्षा कर्मचाऱ्याने दुसऱ्या खेळाडुच्या पायावरही बीप आवाज ऐकला. त्यानंतर खाली टाकलेल्या रेडकार्पेटखाली काय आहे का हे पाहण्याचा निर्णय घेतला. तिथे काहीतरी सापडलं. मध्यस्थांनी माझी माफी मागितली. पण मला बोलावं लागेल की हे किती लाजीरवाणं होतं. महत्त्वाचं म्हणजे माझी लढत होण्याआधी काही मिनिटं आधी हे सगळं घडलं म्हणत नारायणनने आपल्या भावना व्यक्त केल्या.

आयोजकांकडून माफी मागण्यात आली ते कौतुकास्पद आहे. पण या स्थितीला आणखी चांगल्या पद्धतीने हाताळता आलं असतं असंही नारायणनने म्हटलं आहे. खरंतर अशा प्रकारची तपासणी याआधीही झाली आहे. मात्र वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने जेव्हा अमेरिकेचा ग्रँडमास्टर हॅन्स नीमॅनवर फसवणुकीचा आरोप केल्यानंतर ही तपासणी कडक झाली होती.

First published:

Tags: India, Sports