जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भारताच्या बॅडमिंटनपटूला इराणमध्ये हिजाब घालण्याची सक्ती

भारताच्या बॅडमिंटनपटूला इराणमध्ये हिजाब घालण्याची सक्ती

भारताच्या बॅडमिंटनपटूला इराणमध्ये हिजाब घालण्याची सक्ती

भारताची 19 वर्षीय बॅडमिंटनपटू तान्या हेमंतने रविवारी तेहरानमधील इराण फजर इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी सुवर्ण पदक पटकावले. परंतु हिजाब घातल्यानंतरच तिला पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 फेब्रुवारी : भारताची 19 वर्षीय बॅडमिंटनपटू तान्या हेमंतने रविवारी तेहरानमधील इराण फजर इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी सुवर्ण पदक पटकावले. परंतु विजयी झाल्यानंतर सुवर्ण पदक घेण्यासाठी जात असलेल्या खेळाडूला हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली. खेळाडूने हिजाब घातल्यानंतरच तिला पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

News18लोकमत
News18लोकमत

इराणमध्ये मागील काही महिन्यांपासून महिलांच्या हक्कांविषयी आंदोलन केली जात आहेत. परंतु असे असतानाही इराणच्या प्रशासनाकडून महिलांना दिल्या जात असलेल्या वागणुकीत काहीच बदल झालेला नाही. इराणमध्ये महिला बॅडमिंटनपटूंना सामन्यादरम्यान हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली नव्हती. तसेच त्यांना लेगिन्स देखील घालण्याची सक्ती नव्हती. मात्र महिलांचा सामना सुरू असताना कोणत्याही पुरूषाला सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली नाही.   हे ही वाचा  : सचिन तेंडुलकरने मारलेली ‘ती’ हाक लता दीदी कधीच विसरु शकल्या नाहीत

tanya hemanth

इराण आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत जगभरातील बॅडमिंटनपटूंनी सहभाग घेतला होता. यात तान्या हेमंतने गतविजेत्या तसनीम मीरला पराभूत करून  21 - 11 असा सामना जिंकला. हा सामना झाल्यानंतर विजेत्या खेळाडूंना पदकांचे वाटप करण्यात आले परंतु यावेळी पदक घेण्यासाठी येताना महिला खेळाडूंना हिजाब बांधण्यास सांगण्यात आले. तेव्हा भारताची खेळाडू तान्या हेमंतने देखील हिजाब घालूनच पदकाचा स्वीकार केला. या प्रसंगाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात