मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

CWG 2022: बॅडमिंटनमध्ये भारताची 'सोनेरी हॅटट्रिक', पुरुष दुहेरीतही गोल्ड मेडल

CWG 2022: बॅडमिंटनमध्ये भारताची 'सोनेरी हॅटट्रिक', पुरुष दुहेरीतही गोल्ड मेडल

चिराग शेट्टी, सात्विक रानकीरेड्डी

चिराग शेट्टी, सात्विक रानकीरेड्डी

CWG 2022: सिंधू आणि लक्ष्य सेनपाठोपाठ भारताच्या सात्विक रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकावलं. त्यामुळे बर्मिंगहॅममध्ये भारतानं बॅडमिंटनमध्ये सोनेरी यशाची हॅटट्रिक साजरी केली.

    बर्मिंगहॅम, 08 ऑगस्ट: पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेनपाठोपाठ बॅडमिंटनमध्ये भारतानं आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताच्या सात्विक रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकावलं. त्यामुळे बर्मिंगहॅममध्ये भारतानं बॅडमिंटनमध्ये सोनेरी यशाची हॅटट्रिक साजरी केली. चिराग आणि सात्विकनं पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या बेन लेन आणि वॅन्डी सीन या जोडीचा 21-15, 21-13 असा पराभव केला
    Published by:Siddhesh Kanase
    First published:

    Tags: Badminton, Sport

    पुढील बातम्या