मुंबई, 21 जुलै : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात खणखणीत शतक झळकावलं आहे. कोहलीने 10 फोरच्या मतदीने 180 बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं. कोहलीच्या टेस्ट करिअरमधलं हे 29वं शतक आहे. याचसोबत विराटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकांची संख्या 76 वर पोहोचली आहे. विराट कोहलीन बऱ्याच काळानंतर परदेशामध्ये टेस्ट शतक केलं आहे. याआधी त्याने परदेशामध्ये शतक 16 डिसेंबर 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये केलं होतं. आता 1677 दिवस आणि 31 इनिंगनंतर विराटने परदेशामध्ये शतक झळकावलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचं विराटचं हे तिसरं टेस्ट शतक आहे. याआधी त्याने नॉर्थसाऊंड (200) आणि राजकोट टेस्टमध्ये (139) शतकं केली होती. कोहलीने आता टेस्टमध्ये शतकांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत बरोबरी केली आहे. विराट कोहलीचं या वर्षातलं टेस्ट क्रिकेटमधलं हे दुसरं शतक आहे. याआधी त्याने मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद टेस्टमध्ये 186 रनची खेळी केली होती. फॅब फोरवर नजर टाकली तर विराटच्या पुढे फक्त स्टीव्ह स्मिथ आहे. स्मिथच्या नावावर 32 शतकं आहेत, तर जो रूटने 28 आणि केन विलियमसनने 28 शतकं केली आहेत.
The moment King Kohli created history by becoming the first ever to score a century in the 500th match. pic.twitter.com/jgAb0CEuol
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 21, 2023
500व्या सामन्यात शतक विराट कोहलीच्या करिअरमधला हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. आपल्या 500 व्या सामन्यात शतक झळकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी कोणत्याही खेळाडूला त्याच्या 500 व्या सामन्यात 50 रनही करता आल्या नव्हत्या. विराटच्या आधी कुमार संगकाराच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. संगकाराने त्याच्या 500 व्या सामन्यात 48 रन केले होते. विराट कोहलीने या खेळीमध्ये जॅक कॅलिसलाही मागे टाकलं आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट आता पाचव्या क्रमांकावर आहे. विराटने यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 2 हजार रन पूर्ण केले आहेत. विराटशिवाय रोहित शर्मानेही 2 हजार रनचा टप्पा पार केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतकं सुनील गावसकर- 13 जॅक कॅलिस- 12 विराट कोहली- 12 एबी डिव्हिलियर्स- 11 टेस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक शतकं सचिन तेंडुलकर- 44 जॅक कॅलिस- 35 महेला जयवर्धने- 30 विराट कोहली- 25 ब्रायन लारा- 24