भारताची शटल स्टार पीव्ही सिंधूनं इतिहास रचत पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन होण्याची कामगिरी केली आहे.
सिंधूनं जपानच्या नोहामी ओकुहारा विरोधात एकतर्फी विजय मिळवला. सिंधूनं ओकुहाराचा 21-7, 21-7नं पराभव केला.
तब्बल तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची कामगिरी करणाऱ्या सिंधूनं पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकवण्याची कामगिरी केली.
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला खेळाडू बनली आहे. फोर्ब्सनं जाहीर केलेल्या जादीत सिंधू जगभरातील श्रीमंत खेळाडूंच्या यादीत येणारी एकमेव भारतीय आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स हिचा क्रमांका लागतो. या यादीत सिंधू ही एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे.
सेरेना विलियम्सची कमाई ही 29.2 मिलियन डॉलर म्हणजे 207 कोटी आहे. तर, सिंधू वर्षाला 5.5 मिलियन डॉलर म्हणजेच 38.9 कोटी कमवते.
सेरेना जाहिरातीतून 177 कोटी कमवते. तर भारताची स्टार बॅडमिंटनपटू सिंधू जाहिरातींमधून 35.4 कोटी कमवते.
एवढेच नाही तर, बीडब्लूएफ वर्ल्ज टूर जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू सिंधू इंडियन मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी असणारी खेळाडू आहे.
अमेरिकेची एलेक्स मॉर्गन या यादीत 41 कोटी कमाईसह 12व्य़ा स्थानावर आहे. सिंधू आणि मॉर्गन यांच्यात केवळ 2 कोटींचा फरक आहे.