Home /News /sport /

बेन स्टोक्सची अजब कामगिरी, इंग्लंडच्या 142 वर्षांच्या इतिहास पहिल्यांचा घडला असा प्रकार

बेन स्टोक्सची अजब कामगिरी, इंग्लंडच्या 142 वर्षांच्या इतिहास पहिल्यांचा घडला असा प्रकार

142 वर्षांनंतर बेन स्टोक्सनं रचला सर्वात मोठा विक्रम. केली अजब कामगिरी

    केप टाऊन, 06 जानेवारी : इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक नवा विक्रम प्रस्थापित केला. बेन स्टोक्सनं जेम्स अँडरसनच्या चेंडूवर एरिक नॉर्व्हियाचा झेल टिपून 142 वर्षांनंतर विक्रम मोडण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. स्टोक्सचा हा पाचवा झेल होता. त्याने आपले सर्व कॅच स्लिपमध्ये घेतले. इंग्लंडमधील अखेरच्या 1019 कसोटी सामन्यांमध्ये 23 वेळा एका खेळाडूने एका खेळीत चार झेल घेतले पण कोणालाही पाच कॅच घेता आले नाहीत. इंग्लंडने 1877मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. मात्र स्टोक्सआधी कोणत्याही ब्रिटीश खेळाडूला एका कसोटीत 5 झेल पकडता आलेले नाहीत. केपटाऊनमध्ये झालेल्या कसोटीत बेन स्टॉक्सने झुबेर हमजा, फाफ डू प्लेसी, रेसी व्हॅन डर ड्यूसेन, ड्वेन प्रिटोरियर आणि एनरिक नॉर्कोया यांचे झेल पकडले. वाचा-VIDEO : युवा फलंदाजानं मोडला युवराजचा रेकॉर्ड, 6 चेंडूत लगावले 6 सिक्स! एका डावात 11 खेळाडूंनी 5 झेल घेतले आहेत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने गेल्या वर्षी लॉर्ड्स येथे आयर्लंडविरुद्धच्या डावात चार झेल घेतला. स्टोक्सने पाच कॅचच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली. कसोटी सामन्यांमध्ये 11 वेळा खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. स्टोक्सच्या अगोदर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने 2017-18 मध्ये न्यूझीलंडमध्ये हा पराक्रम केला होता. प्रथम, ऑस्ट्रेलियाच्या विक रिचर्डसनने 1936 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध हा पराक्रम केला होता. वाचा-LIVE सामन्यात घुसले 2 साप, थोडक्यात वाचला अजिंक्य रहाणे; PHOTO VIRAL
    अँडरसनने घेतल्या 5 विकेट या सामन्यात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या नेतृत्वात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात 223 धावांत गुंडाळले. अशा प्रकारे इंग्लंडला 46 धावांची आघाडी मिळाली. जेम्स अँडरसनने 40 धावांत 5 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेसाठी फक्त सलामीवीर डीन एल्गर (88) आणि रेसी व्हॅन डेर ड्यूसेन (68) गोलंदाजांना सामोरे जाऊ शकले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. या दोघांशिवाय केवळ क्विंटन डॅकॉक (20) आणि वर्नॉन फिलँडर (नाबाद 13) दुहेरी अंक गाठले आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या