मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी, मालिका गमावण्याचं गंभीर संकट!

IND vs SL : टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी, मालिका गमावण्याचं गंभीर संकट!

श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय बॅट्समन्सनी निराशा केली आहे. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या टीम इंडियानं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये फक्त 8 आऊट 81 रन काढले.

श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय बॅट्समन्सनी निराशा केली आहे. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या टीम इंडियानं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये फक्त 8 आऊट 81 रन काढले.

श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय बॅट्समन्सनी निराशा केली आहे. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या टीम इंडियानं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये फक्त 8 आऊट 81 रन काढले.

कोलंबो, 29 जुलै : श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय बॅट्समन्सनी निराशा केली आहे. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या टीम इंडियानं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये फक्त 8 आऊट 81 रन काढले.  श्रीलंकेकडून हसरंगा (Hasaranga) सर्वात यशस्वी बॉलर ठरला. गुरुवारी 24 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या हसरंगानं 4 ओव्हर्समध्ये फक्त 9 रन देत 4 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाकडून कुलदीप यादवनं सर्वात जास्त 23 रन काढले.

तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात कॅप्टन शिखर धवननं (Shikhar Dhawan) टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला. मोठा स्कोअर करत श्रीलंकेवर दबाव टाकण्याची टीम इंडियाची योजना होती. मात्र धवनसह टॉप ऑर्डरला त्या योजनेनुसार खेळ करता आला नाही. शिखर धवनला भोपळा फोडण्यातही अपयश आले. धवन आऊट झाल्यानंतर आयपीएल स्पर्धा गाजवणाऱ्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांना चांगली संधी होती.

या जोडीला मोठी पार्टनरशिप करण्यात अपयश आले. देवदत्त पडिक्कल 9 रन काढून आऊट झाला. त्यानंतर संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला. सॅमसनला शून्यावर हसरंगानं आऊट केलं. त्यानंतर हसरंगानं त्याच ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडला 14 रनवर आऊट करत टीम इंडियाला चौथा धक्का दिला. हसरंगाचा (Hasaranga) आजच (गुरुवारी) 24 वा वाढदिवस आहे. हसरंगाला एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स देत टीम इंडियानं बर्थ-डे गिफ्ट दिले.

टीम इंडियाचा आणखी एक नवोदीत खेळाडू नितीश राणा (Nitish Rana) देखील या सामन्यात अपयशी ठरला. राणानं फक्त 6 रन काढले. राणा आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची 9 व्या ओव्हर्समध्येच 5 आऊट 36 अशी अवस्था झाली. या धक्क्यानंतर भारतीय इनिंग सावरलीच नाही. हसरंगानं त्यानंतर भुवनेश्वर कुमार आणि वरुण चक्रवर्ती यांना आऊट करत वाढदिवस साजरा केला.

IND vs ENG: Prithvi Shaw, Suryakumar Yadav यांच्या इंग्लंड दौऱ्याबाबत मोठी अपडेट!

या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियानं जिंकला होता. त्यानंतर बुधवारी झालेला दुसरा टी 20 सामना जिंकत श्रीलंकेनं बरोबरी साधली आहे

First published:
top videos

    Tags: Cricket, India Vs Sri lanka