मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: Prithvi Shaw, Suryakumar Yadav यांच्या इंग्लंड दौऱ्याबाबत मोठी अपडेट!

IND vs ENG: Prithvi Shaw, Suryakumar Yadav यांच्या इंग्लंड दौऱ्याबाबत मोठी अपडेट!

श्रीलंका दौऱ्यातील जोरदार कामगिरीनंतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची इंग्लंड दौऱ्यात निवड झाली. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच त्यांची अडचण वाढली आहे.

मुंबई, 29 जुलै: श्रीलंका दौऱ्यातील जोरदार कामगिरीनंतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची इंग्लंड दौऱ्यात निवड झाली. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच त्यांची अडचण वाढली आहे. हे दोघंही टीम कृणाल पांड्याच्या संपर्कात आल्यानं सध्या आयसोलेशनमध्ये असून श्रीलंका विरुद्धच्या मालिकेतून आऊट झाले आहेत. त्यानंतर आता त्यांचा इंग्लंड दौरा देखील संकटात आला आहे.

'इनसाईड स्पोर्ट्स' मधील रिपोर्टनुसार सूर्यकुमार आणि पृथ्वी हे दोघं 30 जुला रोजी इंग्लंडला रवाना होणार होते. त्यानंतर इंग्लंडमध्ये 10 दिवस क्वारंटाईन राहून 12 ऑगस्ट रोजी सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्टसाठी ते खेळाडू टीममध्ये सहभागी झाले असते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे इथून पुढं सर्व गोष्टी मनासारख्या झाल्या तरच हे दोघं इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध होऊ शकतील.

कृणाल पांड्याच्या संपर्कात आल्यानं या दोघांना श्रीलंकेत 7 दिवस आयसोलेशनमध्ये राहवं लागणार आहे. हा कालावधी 2 ऑगस्ट रोजी संपणार आहे. मात्र त्यानंतरही ते लगेच इंग्लंडला रवाना होऊ शकणार नाहीत. कारण, इंग्लंडमधील नियमानुसार कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे इंग्लंडला जाण्यासाठी या दोघांना 5 ऑगस्टपर्यंत आयसोलेशनमध्ये राहवं लागेल. त्यानंतर इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना पुन्हा 10 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. या सर्व अडचणी टाळण्यासाठी आता बीसीसीआय या दोघांच्या ऐवजी नव्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये पाठवण्याचा विचार करत आहे.

IND vs SL: टीम इंडियाला धक्का, आणखी एक खेळाडू मालिकेतून आऊट!

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs England) दुखापतींनी ग्रासलं आहे. शुभमन गिल (Shubhaman Gill), आवेश खान (Avesh Khan) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हे दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून बाहेर झाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england