लखनौ, 6 ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिकेला टी20 मालिकेत पराभवाची धूळ चारल्यानंतर भारतीय संघ सज्ज झाला आहे तो वन डे मालिकेसाठी. रोहितची टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाल्यानं शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत मैदानात उतरणार आहे. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्याच्या अवघे दोन तास आधी बीसीसीआयनं एक मोठी अपडेट दिली आहे. हा सामना नियोजित वेळेनुसार सुरु होणार नसल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे. अर्धा तास उशीरानं सुरु होणार मॅच लखनौमध्ये खेळवली जाणारी मालिकेतली ही पहिली वन डे मॅच नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशीरानं सुरु होणार आहे. म्हणजेच 1.30 वाजता सुरु होणारा हा सामना आता 2 वाजता सुरु होईल. तर नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार 1.30 वाजता मैदानात येतील. बीसीसीआयनं ट्विट करत ही माहिती दिली आहे. हेही वाचा - T20 World Cup: मॅच फिनिशर की पॉवर प्ले स्पेशालिस्ट? वर्ल्ड कपमध्ये या बॅट्समनचा काय असणार रोल? सामन्याला उशीर का****? लखनौमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लखनौच्या आकाशात सध्या काळे ढग भरुन आले आहेत. त्यामुळे मैदानाची पाहणी करुन टॉस उशीरानं करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज लखनौमध्ये सामन्यादरम्यान बऱ्याच वेळा पावसाचा व्यत्यय येणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या वन डेत खेळ कमी आणि पावसाचाच खेळ जास्त असं सध्याचं चित्र आहे.
🚨 Update 🚨
— BCCI (@BCCI) October 6, 2022
Rain delay!
After an early inspection, the Toss and Match Time for the #INDvSA Lucknow ODI has been pushed by half an hour.
The Toss will be at 1:30 PM IST.
Play begins at 2:00 PM IST.
झिम्बाब्वेनंतर **‘गब्बर’**समोर नवं आव्हान झिम्बाब्वे दौऱ्यानंतर पुन्हा एकदा बीसीसीआयनं वन डे संघाची धुरा शिखर धवनकडे सोपवण्यात आली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातल्या वन डे मालिकेतही धवनच्या नेतृत्वात टीम इंडियानं वन डे मालिका जिंकली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही भारतीय संघ धवनच्या नेतृत्वात चांगली कामगिरी बजावेल अशी अपेक्षा आहे.
Preps ✅#TeamIndia ready for the #INDvSA ODI series. 👍 👍 pic.twitter.com/5fY3m1a8lq
— BCCI (@BCCI) October 6, 2022
भारताचा वन डे संघ - धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, सिराज, दीपक चहर

)







