मुंबई, 6 डिसेंबर: नुकतीच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये 2 टेस्ट मॅचची सिरीज (IND vs NZ 2ndTest Series)पार पडली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने 372 धावांनी जिंकला. टीम इंडियाच्या विजयाची चर्चा सुरु असतानाच किवींचा खेळाडू डॅरील मिशेलने मयंक अग्रवालबाबत मोठा खुलासा (Daryl Mitchell says he took cue from Mayank Agarwal to counter Indian spinners)केला आहे. भारताने दिलेल्या 540 रनांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला केवळ 167 रनांची मजल मारता आली. सामन्याच्याच्या तिसऱ्या दिवशी डॅरील मिशेलने न्यूझीलंड संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अर्धशतकी खेळी केली होती. यासंर्दभात त्याने एका स्पोर्ट चॅनेलशी बोलताना भाष्य केले. ‘‘मी मयंक अग्रवालच्या फलंदाजीवरून धडा घेतला आहे. त्याने ज्याप्रकारे आमच्या फिरकी गोलंदाजांवर दबाव आणला, तसच काहीसं मी देखील करण्याचा प्रयत्न केला. मी खेळपट्टीवर टिकून राहू शकलो नाही, हे निराशाजनक आहे. परंतु, भागीदारी करणे समाधानकारक होते.” असे मत सामना संपल्यानंतर मिशेलने व्यक्त केले. तसेच, गोलंदाज सतत तुमच्यावर दबाव आणत असतात आणि तुम्ही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात. संघर्ष करून विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. ही आव्हान देणारी खेळपट्टी आहे. निश्चितच चेंडू खूप जास्त फिरकी घेत आहे. कुठल्याही चेंडूवर फलंदाज बाद होऊ शकतो. असेही मिशेल यावेळी म्हणाला. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी कमालिची खेळी केली. विशेष म्हणचे सध्या क्रिकेट जगतात मयंक अग्रवालच्या खेळीची जोरदार चर्चा रंगली आहे. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या मयांक अगरवालने पहिल्या डावात शतक, तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.