लंडन, 30 जून : इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजआधी टीम इंडियाला (India vs England) धक्का बसला आहे. शुभमन गिल (Shubhaman Gill) दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही मॅच खेळू शकणार नसल्याचं वृत्त आहे. शुभमन गिलच्या या दुखापतीमुळे टीम इंडियातल्या दोन खेळाडूंना नशिबाची साथ मिळाली आहे, पण कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कोणाला संधी देतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शुभमन गिलच्या अनुपस्थितीमध्ये मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) किंवा केएल राहुल (KL Rahul) यांच्यापैकी एकाला रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) ओपनिंगची संधी मिळेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पहिल्या सत्रामध्ये मयंक अग्रवाल दोन द्विशतकं करणारा पहिला भारतीय होता. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. मयंकने 13 टेस्टच्या 21 इनिंगमध्ये 1005 रन केले आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
केएल राहुलने ओपनर म्हणून 33 टेस्टच्या 54 इनिंगमध्ये 37 च्या सरासरीने 1,915 रन केले आहेत. राहुलने टेस्ट क्रिकेटमध्ये 5 शतकं आणि 10 अर्धशतकं केली आहेत.
परदेशी मैदानात राहुलने 20 सामन्यांच्या 33 इनिंगमध्ये 33 च्या सरासरीने 1084 रन केले, यामध्ये 4 शतकं आणि 3 अर्धशतकं आहेत. तर मयंकने 8 मॅचच्या 15 इनिंगमध्ये 27 च्या सरासरीने 408 रन केले, यात 4 अर्धशतकं आहेत. परदेशातली ही कामगिरी बघितली तर केएल राहुल मयंक अग्रवालपेक्षा वरचढ ठरतो.
इंग्लंडमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी
टीम इंडियाची इंग्लंडमधली कामगिरी फारच निराशाजनक झाली आहे. भारताने इकडे 63 टेस्ट खेळल्या, यातल्या 35 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, तर फक्त 7 टेस्ट त्यांना जिंकता आल्या आणि 21 टेस्ट ड्रॉ राहिल्या. भारताने 2018 साली इंग्लंडमध्ये अखेरची टेस्ट सीरिज खेळली होती, यात विराटच्या टीमचा 4-1 ने पराभव झाला होता. भारताने इंग्लंडमध्ये अखेरची सीरिज 2007 साली राहुल द्रविड कर्णधार असताना जिंकली होती. इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून फक्त कपिल देव (Kapil Dev) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) या दोघांचा टेस्टमध्ये पराभव झाला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Team india