पुणे, 30 मार्च : भारताच्या टी-20 टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शिखर धवनने (Shikhar Dhawan) इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये (India vs England) धमाकेदार कामगिरी केली. तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये धवनने दोन अर्धशतकं केली, यातल्या एका मॅचमध्ये त्याचं शतक फक्त 2 रनने हुकलं. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन यांची ओपनिंग जोडी वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार रन करण्यापासून फक्त 23 रन दूर आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेनंतर कॉमेंटेटर अजित आगरकरने (Ajit Agarkar) शिखर धवनला टी-20 टीममधून डच्चू मिळाल्यावर कसं वाटलं? असा प्रश्न विचारला. यावर शिखर धवननेही कडक उत्तर दिलं. 'मी कायमच चांगली कामगिरी करत होतो, टी-20 सीरिजमध्ये मी खेळलो नाही, एवढच. मला जेव्हा संधी मिळाल्या, त्याचा मी पुरेपूर फायदा उठवला. मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळलो. या स्थानिक स्पर्धा माझ्या सरावासाठी चांगल्या होत्या. या स्पर्धांमध्ये खेळल्यामुळे मी आनंदी आहे. खेळपट्ट्याही चांगल्या होत्या,' असं उत्तर धवनने हसत हसत दिलं.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचनंतर शिखर धवनला टीमबाहेर बसवण्यात आलं. विराट कोहलीनेही केएल राहुल आणि रोहित शर्मा हे आमचे टी-20 मधले ओपनिंगचे प्राधान्याचे खेळाडू असतील, तसंच शिखर धवन हा तिसरा पर्याय असेल असं सांगितलं. यानंतर विराटने इशान किशनला ओपनिंगला संधी दिली, त्यानेही या संधीचं सोनं करत पहिल्याच सामन्यात अर्धशतक केलं. तसंच टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपण रोहितसोबत ओपनिंगला खेळू शकतो, असे संकेतही विराटने दिले. त्यासाठी आपण आयपीएलमध्येही ओपनिंगला येणार असल्याचं विराटने सांगितलं. विराटची ही भूमिका बघता शिखर धवनचे टी-20 करियर धोक्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma, Shikhar dhawan, Sports